सजावटीच्या फुलांना मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सजावटीच्या फुलांना मागणी
सजावटीच्या फुलांना मागणी

सजावटीच्या फुलांना मागणी

sakal_logo
By

पुणे : बाप्पांच्या सजावटीला फुलांना अधिक महत्त्व असते. त्यामुळे ग्राहकांकडून फुलांना मागणी वाढली आहे. पूजेच्या विविध वस्तू खरेदीसाठी बाजारपेठ गर्दीने फुलली आहे. गणेशोत्सवामुळे पुणे जिल्हा, बीड, सातारा आणि सोलापूर येथून पिवळा आणि लाल झेंडूची आवक होत आहे. घाऊक बाजारात पिवळा-लाल झेंडूला दर्जानुसार प्रतिकिलोला २० ते ५० रुपये भाव मिळाल्याचे फुलबाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी सांगितले. गणेशोत्सवापर्यंत फुलांना मागणी असल्याने भाव तेजीत असणार आहेत. तसेच, गौरी आगमनामुळे डच गुलाब, जरबेरा, कार्नेशियन आदी सजावटीच्या फुलांनाही मागणी वाढली आहे. उत्सवामुळे पूजेच्या आणि सजावटीच्या फुलांना मागणी टिकून असल्याचेही विक्रेते सागर भोसले यांनी सांगितले.

फुलांचे भाव
झेंडू : २०-५०, गुलछडी : २००-५००, शेवंती : ८०-१५०, ऑष्टर : १६-२५, साधा गुलाब : ३०-५०, डच गुलाब : ८०-१५०.

Web Title: Todays Latest Marathi News Yar22b01975 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..