मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात दसरा मेळावा व्हावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात दसरा मेळावा व्हावा
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात दसरा मेळावा व्हावा

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात दसरा मेळावा व्हावा

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार जोपासले असते तर महाविकास आघाडी अस्तित्वात आली असती का? बाळासाहेब जिवंत असते तर आघाडी झाली असती का, तुम्हीच सांगा? असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा दसरा मेळावा व्हावा, अशी अपेक्षा सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी व्यक्त केली.

पुण्यातील कार्यक्रमावेळी पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बंडखोर आमदारांपैकी १० ते १५ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. याबाबत बोलताना पाटील म्हणाले, चंद्रकांत खैरे राहतात औरंगाबादला, त्यांचा अजून आकडाही निश्चित नाही. यातील १० धरायचा की १५ धरायचा? खैरे यांना नेमकं काय म्हणायचे आहे? ढगात गोळ्या मारून वातावरण भांबावून सोडण्याचा त्यांचा उद्योग आहे. त्यांना काही येत नाही. त्यांचे गटांगळ्या खाण्याचे काम सुरू आहे.

हे सरकार अडीच वर्षांपूर्वीच बनायला हवे होते़ पण, काही राजकीय घटनांमुळे नैसर्गिक युतीचे सरकार बनू शकले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगल्या पद्धतीने सुरू आहे. येत्या अडीच वर्षांत हे सरकार लोकाभिमुख होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

आम्हाला डाळिंबाची खोके माहीत...

विरोधक गद्दार म्हणून खोके काढताहेत. आम्हाला डाळिंबाची पेटी भरणारे खोके माहीत आहे. ज्यांची संस्कृती राजकारणात खोक्यांवर अवलंबून आहे, अशी मनोवृत्तीचेच खोक्याचे बोलत आहेत, असे शहाजी पाटील यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Yar22b01977 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..