मंडई टोमॅटो, फ्लॉवर, शेवग्याच्या भावात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडई टोमॅटो, फ्लॉवर, शेवग्याच्या भावात वाढ
मंडई टोमॅटो, फ्लॉवर, शेवग्याच्या भावात वाढ

मंडई टोमॅटो, फ्लॉवर, शेवग्याच्या भावात वाढ

sakal_logo
By

मार्केट यार्ड, ता. ४ : बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. परिणामी, टोमॅटो, फ्लॉवर आणि शेवग्याच्या भावात वाढ झाली असून घेवडा आणि वांग्याच्या भावात घट झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशमधून हिरव्या मिरचीची तीन ट्रक, कर्नाटकातून कोबी दोन ट्रक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमधून एक टेम्पो शेवगा, कर्नाटकमधून पाच टेम्पो घेवडा, इंदौरहून नऊ टेम्पो गाजर, मध्य प्रदेशातून लसणाची १४ ट्रक आवक झाली तर राज्याच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आल्याची ९०० पोती, भेंडीची सहा टेम्पो, गवारची पाच टेम्पो, टोमॅटोची सहा हजार कॅरेट, फ्लॉवरची आठ टेम्पो, कोबीची सात टेम्पो, सिमला मिरचीची १२ टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, कांद्याची ८० ट्रक, आंध्रप्रदेश आणि इंदूर येथून ३५ ट्रक बटाट्याची आवक झाली, अशी माहिती मार्केटयार्ड येथील ज्येष्ठ व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव- कांदा : १००-१४०, बटाटा : १७०-२१०, लसूण : १००-४००, आले सातारी : १००-३५०, भेंडी : ३००-४००, गवार : गावरान व सुरती ३००-५००, टोमॅटो : १६०-२००, दोडका : ३५०-४००, हिरवी मिरची : ३००-४००, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : ३५०-३००, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी : २५०-३००, पापडी : ३५०-४००, पडवळ : २५०-३००, काकडी : १५०-२००, फ्लॉवर : ३५०-४००, कोबी : १२०-१८०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : २००-२५०, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : १६०-२००, शेवगा : ७००-७५०, गाजर : ३००-४००, वालवर : ३००-३५०, बीट : १४०-१६०, घेवडा : ३००-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : ३००-३५०, ढेमसे : २००-२५०, भुईमुग शेंग : ४५०-५००, मटार : स्थानिक : ४००-७००, पावटा : ३००-३५०, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : २००-२२०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.


कोथींबीर, कांदापात, पालक स्वस्त
श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात पालेभाज्यांची आवक वाढली असून कोथींबीर, कांदापात, चाकवत आणि पालकच्या
भावात घट झाली असून राजगिरा आणि चवळईच्या भावात वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मार्केटयार्डात कोथींबीर दोन लाख आणि मेथीची ८० हजार जुड्यांची आवक झाली.
घाऊक बाजारात जुडीमागे कोथींबीरीच्या भावात पाच रुपयांनी, कांदापात सहा रुपये, चाकवत दोन रुपये आणि पालकच्या भावात तीन रुपयांनी घट झाली. राजगिरा आणि चवळईच्या भावात प्रत्येक एक रुपयांनी वाढ झाली.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ५००-१५००, मेथी : ६००-१२००, शेपू : ४००-८००, कांदापात : ८००-१२००, चाकवत : ४००-६००, करडई : ५००-७००, पुदीना : ३००-८००, अंबाडी : ४००-७००, मुळे : ८००-१५००, राजगिरा : ४००-७००, चुका : ६००-१०००, चवळई : ६००-८००, पालक : ६००-१२००.

डाळींब, कलिंगड,खरबुज महागले
गणेशोत्सवामुळे फळांना मागणी वाढली आहे. परिणामी डाळींब, कलिंगड, लिंबू, पपई आणि खरबुजाच्या भावात वाढ झाली असून पेरुची आवक वाढल्याने भावात घट झाली आहे तर सीताफळ, अननस, संत्रा, मोसंबी आणि चिक्कूचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
लिंबू एक ते दीड हजार गोणी, डाळिंब सुमारे ४५ टन, पपई सहा टेम्पो, कलिंगड पाच टेम्पो, खरबूज सुमारे ३० टेम्पो, पेरु ९०० क्रेट, अननस तीन ट्रक, मोसंबी ७० टन, संत्रा १० टन, सीताफळ ३५ टन, चिक्कू दोन हजार बॉक्सची आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ७००-९००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ४०-१६०, गणेश : ५-२५, आरक्ता १०-६०. कलिंगड : ८-१५, खरबूज : २०-३०, पपई : १५-३५, अननस (एक डझन) ः ७०-२७०, पेरु (२० किलो) ः ३००-४००, मोसंबी (तीन डझन) १००-२००, (चार डझन) ः ३०-६०, संत्रा (दहा किलो) ः ३००-८५०, सीताफळ (एक किलो) ः २०-१२०, चिक्कू (१० किलो) ः १००-६००.

झेंडूच्या भावात निम्म्याने घट
फुलबाजारात झेंडूची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने भावात निम्म्याने घट झाली. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे फुलांना फटका बसला आहे. अन्य फुलांना मागणी साधारण असून दर स्थिरच असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-३०, गुलछडी : १५०-३००, आॅष्टर : जुडी ः १०-२०, सुट्टा ः १५०-२००, बिजली : ८०-१५०, कापरी : २०-४०, शेवंती : ८०-१५०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-५०, गुलछडी काडी : ३०-८०, डच गुलाब (२० नग) : ६०-१५०, जर्बेरा : ४०-७०, कार्नेशियन : १५०-२००, शेवंती काडी ः १५०-२००, लिलियम (१० काड्या) ः १२००-१३००, आॅर्चिड : ४००-६००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ७०-१००.

Web Title: Todays Latest Marathi News Yar22b01982 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..