फ्लॉवर, ढोबळी मिरचीच्या भावात घट , | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फ्लॉवर, ढोबळी मिरचीच्या भावात घट
,
फ्लॉवर, ढोबळी मिरचीच्या भावात घट ,

फ्लॉवर, ढोबळी मिरचीच्या भावात घट ,

sakal_logo
By

मार्केट यार्ड, ता. ११ : भाजीपाला तरकारी विभागात मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने फ्लॉवर, ढोबळी मिरचीच्या भावात दहा टक्क्यांनी घट झाली आहे. तर शेवग्याची आवक घटल्याने दरात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.
पुणे विभागात झालेल्या पावसाचा फटका टोमॅटोच्या पिकाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. पावसाचा तडाखा बसल्याने बाजारात जवळपास ७५ ते ८० टक्के माल हलक्या प्रतीचा आहे. बाजारात बहुतांश फळभाज्यांची आवक जावक कायम असल्याने दर टिकून होते. मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी (ता. ११) राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे ८० ते ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली.
परराज्यांतून आलेल्या शेतमालामध्ये कर्नाटक, तमिळनाडू व गुजरात येथून सुमारे ५ ते ६ टेंपो हिरवी मिरची, गुजरात येथून ३ टेंपो कोबी, इंदूर येथून ७ ते ८ टेंपो गाजर, गुजरात येथून २ टेंपो भुईमूग शेंग, कर्नाटक येथून ३ ते ४ टेंपो घेवडा तर मध्य प्रदेशातून लसणाची १० ते १२ ट्रक इतकी आवक झाली असल्याची माहिती ज्येष्ठ व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ५०० ते ६०० पोती, टोमॅटो ७ ते ८ हजार क्रेट, फ्लॉवर १० ते १२ टेंपो, कोबी ५ ते ६ टेंपो, ढोबळी मिरची ८ ते १० टेंपो, हिरवी मिरची ५ ते ६ टेंपो, गवार ५ ते ६ टेंपो, भेंडी ५ ते ६ टेंपो, भुईमूग ५० ते ६० गोणी, मटार ४०० गोणी, तांबडा भोपळा ८ ते १० टेंपो, कांदा ५० ट्रक यांसह इंदूर आणि आग्रा, इंदूर येथून बटाट्याची ४० ते ४२ ट्रक इतकी आवक झाली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव- कांदा : १२०-१६०, बटाटा : १७०-२२०, लसूण : १००-४००, आले सातारी : १००-४००, भेंडी : ३००-४००, गवार : गावरान व सुरती ३००-५००, टोमॅटो : १००-२००, दोडका : ३५०-४००, हिरवी मिरची : २५०-३५०, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २००-२५०, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी :२००-२५०, पापडी : ३५०-४००, पडवळ : २५०-८००, काकडी : १२०-१६०, फ्लॉवर : १००-१२०, कोबी : १२०-१६०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : २५०-३००, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : १६०-२००, शेवगा : ७००-७५०, गाजर : ३००-४००, वालवर : ३००-४००, बीट : १८०-२००, घेवडा : ४००-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी: २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २००-२२०, भुईमूग, शेंग : ४५०-५००, मटार : स्थानिक: ४००-७००, पावटा : ३००-३५०, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : २००-२२०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्यांची आवक, भाव स्थिर
मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबीर व मेथी वगळता अन्य पालेभाज्यांची आवक व भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिले. आवक घटण्यासह मागणीही कमी राहिल्याने मेथीचे भाव स्थिर राहिले. तर, मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने कोथिंबिरीच्या भावात जुडीमागे ५ रुपयांनी वाढ झाली. रविवारी बाजारात १ लाख २५ हजार जुडी व मेथीची ५० हजार जुडी आवक झाली. रविवारी घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या प्रतिजुडीचे भाव ६ ते २० रुपये इतके असल्याचे व्यापारी अमोल घुले यांनी सांगितले.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : १०००-२०००, मेथी : ६००-१२००, शेपू : ६००-८००, कांदापात : ८००-१२००, चाकवत : ४००-६००, करडई : ५००-७००, पुदीना : ३००-८००, अंबाडी : ४००-७००, मुळे : ८००-१५००, राजगिरा : ४००-८००, चुका : ६००-१०००, चवळई : ४००-७००, पालक : ६००-१२००.

कलिंगड, खरबूज, पपई, डाळिंब महागले
पावसामुळे कलिंगड, खरबूज, पपई व डाळिंब या फळांची आवक घटली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने डाळिंबाचे भाव दहा टक्क्यांनी तर कलिंगड, खरबूज व पपईच्या भावात किलोमागे ३ ते ५ रुपयांची वाढ झाली आहे. बाजारात लिंबांना मागणी वाढली आहे. परिणामी, लिंबाच्या १५ किलोच्या गोणीमागे शंभर ते दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. उर्वरित सर्व फळांची आवक-जावक कायम असल्याने फळांचे भाव टिकून आहेत.
फळबाजारात केरळ येथून अननस ४ ट्रक, संत्री १५ टन, मोसंबी ५५
ते ६० टन, डाळिंब ३५ टन, पपई २० ते २५ टेंपो, लिंबे सुमारे १ हजार २०० ते १ हजार ४०० गोणी, पेरू ६०० ते ७०० क्रेट, कलिंगड १० ते १२ गाड्या, खरबूज ३ ते ४ गाड्या, सफरचंद ४ ते ५ हजार बॉक्स तर सीताफळाची २० टन इतकी आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे - लिंबे (प्रति गोणी) : ७००-१२००, अननस : ७०-२७०, मोसंबी : (३ डझन) : १००-२२०, (४ डझन) : २५ ते १००, संत्री : (१० किलो) : २००-६००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१५०, गणेश : ५-२५, आरक्ता १०-६०. कलिंगड : ५-१७, खरबूज : १०-४०, पपई : ५-३०, पेरू (२० किलो) : ३००-५००, चिकू (१० किलो) : १००-५००, सीताफळ : १०-१२५, सफरचंद (२५ ते ३० किलो) : १५००-२५००.

फुलांच्या मागणीत घट
गणेशोत्सवानंतर बाजारातील आवक घटली आहे. बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत माल कमी असल्याने बाजारातील फुलांच्या दरात किरकोळ घट झाली आहे. फुलउत्पादक क्षेत्रात झालेल्या पावसामुळे बाजारात ओली फुले दाखल होण्याचे प्रमाण जवळपास ६० ते ७० टक्के आहे. परिणामी, या फुलांच्या तुलनेत सुक्या फुलांना चांगले दर मिळत असल्याची माहिती फुल बाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी दिली.
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-३०, गुलछडी : ३०-६०, अ‍ॅष्टर : जुडी १०-२०, सुट्टा १००-१२०, बिजली : ३०-४०, कापरी : १०-३०, शेवंती : ३०-५०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-२०, गुलछडी काडी : १०-४०, डच गुलाब (२० नग) : ४०-८०, जर्बेरा : २०-४०, कार्नेशियन : ५०-१००, शेवंती काडी ८०-१५०, लिलियम (१० काड्या) १०००-१२००, ऑर्चिड ३००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ५०-१००.

Web Title: Todays Latest Marathi News Yar22b01989 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..