आधार कार्ड, पॅनकार्ड, रहिवासी दाखला देण्याचे डमी आडत्यांना आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आधार कार्ड, पॅनकार्ड, 
रहिवासी दाखला देण्याचे 
डमी आडत्यांना आदेश
आधार कार्ड, पॅनकार्ड, रहिवासी दाखला देण्याचे डमी आडत्यांना आदेश

आधार कार्ड, पॅनकार्ड, रहिवासी दाखला देण्याचे डमी आडत्यांना आदेश

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : मार्केट यार्डातील डमी आडत्यांसह गाळ्यावर काम करणाऱ्या दिवाणजी, हमाल आणि मदतनीस यांची माहिती बाजार समितीला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. फळ आणि भाजीपाला विभागातील गाळाधारकांना आधार कार्ड, पॅन कार्ड, दोन फोटो आणि रहिवासी दाखला बाजार समितीकडे जमा करावे लागणार आहे. याबाबत बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी आदेश दिले.
बाजारातील डमी अडत्यांकडून शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तसेच डमी अडते साध्या कागद अथवा व्हॉट्‌सॲपवर शेतकऱ्यांना बिल देत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर डमी आडत्यांसह बाजारात काम करणाऱ्या इतर घटकांची माहिती बाजार समितीकडे नसल्याचे निष्पन्न झाले होते. या पार्श्‍वभूमीवर उपाययोजना करत बाजार समितीने सकारात्मक पाऊल उचलले आहे.
यामुळे बाजार समितीचा सेस तर बुडतोच. परंतु, पैसे देण्यास टाळाटाळ केल्याचा आणि धमकाविल्याचा तक्रारी शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे केल्या आहेत. अशा घटनांमध्ये काही डमी हे परप्रांतीय आहेत. हे लक्षात घेऊन बाजार समितीने सुरक्षिततेच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलले आहे. लवकरात लवकर माहिती जमा करण्यास गाळेधारकांना सांगितले आहे.

गाळेधारकानेच डमी आडत्याला भाडे घेऊन व्यापार करण्यास परवानगी दिलेली असते. त्यामुळे गाळेधारकांनाच फसवणुकीचे पैसे भरावे लागतील. बाजारातील डमी आडत्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडविल्याच्या तक्रारी बाजार समितीकडे आल्या आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांचे पैसे बुडविल्यास अथवा सेस चुकविल्याचे निष्पन्न झाल्यास, ते भरण्याची जबाबदारी गाळेधारकांचीच आहे.
- मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

Web Title: Todays Latest Marathi News Yar22b02015 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..