Pune : बाजारात फळभाज्यांची ९० ट्रक आवक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune
बाजारात फळभाज्यांची ९० ट्रक आवक

Pune : बाजारात फळभाज्यांची ९० ट्रक आवक

मार्केट यार्ड : मागील आठवड्याच्या तुलनेत रविवारी बाजारात दोडका, कारले, हिरवी मिरची, गाजर आणि घेवड्याच्या भावात घट झाली. तर अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

बाजारात राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या भाजीपाल्याच्या आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात येथून सुमारे १४ ते १५ टेंपो हिरवी मिरची, कर्नाटक येथून ३ ते ४ टेंपो कोबी, आंध्रप्रदेश, इंदूर येथून २ टेंपो गाजर, गुजरात येथून २ ते ३ टेंपो भुईमूग शेंग, कर्नाटक येथून ३ ते ४ टेंपो घेवडा तर मध्य प्रदेशातून लसणाची ७ ते ८ ट्रक इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १३०० ते १४०० पोती, टोमॅटो सात ते आठ हजार क्रेट, गवार ५ ते ६ टेंपो, भेंडी ५ ते ६ टेंपो, हिरवी मिरची ७ ते ८ टेंपो, फ्लॉवर १० ते १२ टेंपो, कोबी ५ ते ६ टेंपो, ढोबळी मिरची ८ ते १० टेंपो, मटार ३० ते ४० गोणी, गाजर २ ते ३ टेंपो, तांबडा भोपळा ८ ते १० टेंपो, शेवगा २ टेंपो, कांदा ७० ते ८० ट्रक, आग्रा, इंदूर आणि पुणे विभागातून बटाटा ४० ट्रक इतकी आवक झाली, अशी माहिती मार्केट यार्ड येथील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव- कांदा : १८०-२४०, बटाटा : १८०-२५०. लसूण : ११०-५००, आले सातारी : १५०-३५०, भेंडी : २५०- ३००, गवार : गावरान व सुरती ३००-५००, टोमॅटो : २००३००, दोडका : २५०-३००, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : १५०-२००, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी :२००-२५०, पापडी : ३००-३५०, पडवळ : २००-२५०, काकडी : १००-१६०, फ्लॉवर : १००-१६०, कोबी : १५०-२००, वांगी : ३००-४५०, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : २००-२५०, ढोबळी मिरची : ४००-५००, तोंडली : कळी ५००-६००, जाड : २५०-३००,
शेवगा : १०००, गाजर : १५०-२००, वालवर : ३५०-४००, बीट : २५०-३००, घेवडा : ३००, कोहळा : १००-१५०, आर्वी:२००-२५०, घोसावळे : २५०-३००, ढेमसे : २००-२५०, भुईमूग शेंग : ५००-५५०, मटार : स्थानिक: १४००-१६००, पावटा : ४००- ४५०, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : २२०-२४०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

कोथींबीर, कांदापात स्वस्त
गुलटेकडी येथील मार्केटयार्डात रविवारी गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथींबीर, कांदापात, करडई आणि पुदीना यांच्या भावात घट झाली असून चाकवत, मुळे, चवळई आणि पालकच्या भावात घट झाली आहे तर मेथी, शेपू, अंबाडी आणि
राजगिरा यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली़. दरम्यान कोथिंबिरीच्या दीड लाख गड्ड्यांची आवक झाली तर मेथीच्या ५० हजार गड्ड्यांची आवक झाली़ कोथींबीर आणि कांदापात तीन रुपयांनी, पुदीना दोन रुपयांनी करडई एक रुपयांनी उतरली आहे. तर पालक आठ रुपये, चुका चार रुपये, मुळे दोन रुपये आणि चवळई एक रुपयांनी वाढ झाली आहे. पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ८००-१२००, मेथी : १२००-१६००, शेपू : ६००-८००, कांदापात : ६००-१५००, चाकवत : ५००-७००, करडई : ४००- ६००, पुदीना : २००-६००, अंबाडी : ५००-७००, मुळे : ८००-१८००, राजगिरा : ४००-८००, चुका : ८००-१२००, चवळई : ४००-७००, पालक : १२००-२०००.


सीताफळ, लिंबू, चिन्ह,
संत्री, मोसंबीचे भाव स्थिर

गुलटेकडी येथील मार्केटयार्डात रविवारी कलिंगड, खरबूज, पपई, अननस आणि पेरुच्या भावात वाढ झाली असून सफरचंदाच्या भावात घट झाली आहे तर सीताफळ, लिंबू, चिन्ह, डाळिंब, मोसंबी आणि संत्र्याचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
कलिंगड आणि पपईच्या प्रतिकिलो भावात दोन रुपये, खरबूज पाच रुपये, अनसन प्रति डझन दोनशे रुपये आणि पेरू क्रेटमागे ५० रुपयांनी वाढ झाली आहे़ तर सफरचंदाचे भाव पेटीमागे १०० रुपयांनी घटले आहेत.

लिंबू दीड ते दोन हजार गोणी, डाळिंब सुमारे ४० ते ४५ टन, पपई ७ ते ८ टेम्पो, कलिंगड १ ते २ टेम्पो, खरबूज सुमारे १ ते २ टेम्पो, पेरू ६०० ते ७०० क्रेट, अननस ४ ट्रक, मोसंबी ४५ ते ५० टन, संत्री १५ ते २० टन, सीताफळ
३० ते ४० टन, चिक्कू चारशे बॉक्स इतकी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : २५०-४५०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ५०-२००, आरक्ता: २०-६०, गणेश : १०-४०, आरक्ता २०-६०. कलिंगड : १२-२०, खरबूज : ३०-४०, पपई : १२-१६, अननस (एक डझन) १००-५००,
पेरू (२० किलो) ३००-६००़ मोसंबी (तीन डझन) २२०-३५०, (चार डझन) ११०-२३०, संत्री (दहा किलो) २००-५००, सीताफळ (एक किलो) २०-१००, चिक्कू (१० किलो)१००-७००