गाजर, काकडी, कोबीच्या भावात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गाजर, काकडी, कोबीच्या भावात वाढ
गाजर, काकडी, कोबीच्या भावात वाढ

गाजर, काकडी, कोबीच्या भावात वाढ

sakal_logo
By

मार्केट यार्ड, ता. ३० : मागील आठवड्याच्या तुलनेत रविवारी बाजारात गाजर, काकडी, कोबीच्या भावात वाढ झाली असून टोमॅटोचे भाव घटले आहेत. तर अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. बाजारात राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या भाजीपाल्याच्या आवकमध्ये कर्नाटक, गुजरात येथून सुमारे १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटकातून ४ टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश, इंदौर येथून २ टेम्पो गाजर, गुजरात येथून २ टेम्पो भुईमूग शेंगा, तमिळनाडूतून २ टेम्पो शेवगा तर मध्य प्रदेशातून लसणाची ७ ट्रक आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे १००० ते १२०० पोती, टोमॅटो आठ ते दहा हजार क्रेटस, गवार ५ ते ६ टेम्पो, भेंडी ५ ते ६ टेम्पो, हिरवी मिरची ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ८ टेम्पो, काकडी ८ ते १० टेम्पो, मटार १०० गोणी, गाजर ५ टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, कांदा ७० ट्रक, आग्रा, इंदोर आणि पुणे विभागातून बटाटा ५० टेम्पो इतकी आवक झाली असल्याची माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

फळभाज्यांचे भाव (१० किलो) -
कांदा : २५०-३३०, बटाटा : २२०-३००. लसूण : १५०-५००, आले सातारी : २००-४५०, भेंडी : २००- ३००, गवार : गावरान व सुरती ३००-५००, टोमॅटो : २००-२५०, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : ३००-४००, दुधी भोपळा : २००-२५०, चवळी : २००-३००, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी : २००-२५०, पापडी : ३००-४००, पडवळ : २००-२५०, काकडी : २००-२५०, फ्लॉवर : १२०-१६०, कोबी : २००-२५०, वांगी : २५०-४००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : ४००-५००, तोंडली : कळी ४००-४५०, जाड : २००-२५०, शेवगा : १०००-१२००, गाजर : ३००-४००, बीट : २५०-३००, घेवडा : ३००-४५०, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : ३००-३५०, ढेमसे : २००-२५०, भुईमुग शेंग : ५००-५५०, मटार : स्थानिक : १४००-१६००, पावटा : ४००- ४५०, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

कोथिंबीर, करडईच्या भावात वाढ
गुलटेकडी येथील मार्केटयार्डात रविवारी मागील आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीर, करडईच्या भावात वाढ झाली असून इतर भाज्यांचे भाव स्थिर आहेत. दरम्यान कोथिंबीरीच्या दोन लाख गड्ड्यांची आवक झाली तर मेथीच्या ६० हजार गड्ड्यांची आवक झाली. कोथिंबीर १० रुपये तर करडईच्या भावात दोन रुपयांनी वाढ झाली आहे.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव :
कोथिंबीर : १०००-२५००, मेथी : १२००-१३००, शेपू : ६००-८००, कांदापात : ६००-१६००, चाकवत : ४००-७००, करडई : ५००- ७००, पुदीना : ३००-६००, अंबाडी : ५००-६००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ४००-६००, चुका : ८००-१२००, चवळई : ४००-६००, पालक : १०००-१५००.

फळ बाजार ः
फळ बाजारात रविवारी (ता.३०) लिंबाची सुमारे दीड हजार गोणी, डाळिंब ४० टन, पपई १५ टेम्पो, चिक्कू ६०० बॉक्स, मोसंबी ७० टन, संत्रा २५ टन, पेरू सुमारे २० टन कलिंगड १० तर, खरबूज २ पिकअप, सिताफळ ३० टन आवक झाली होती. तर सोलापूरातून विविध बोरांची २० ते २५ गोणी आवक झाली.
फळांचे दर ः
लिंबे (गोणीस) - ३००-६००, डाळिंब (किलो) गणेश - १०-४०, भगवा ५०-२००, आरक्ता २०-८०, पपई प्रतिकिलो -१२-२५, पेरू (२० किलो) -२००-५००, सिताफळ - १५ -७०, कलिंगड २०-२५, खरबूज ३०-४५, मोसंबी ३ डझन २२०-३५०, ४ डझन १२०-२१०. संत्रा (१० किलो) २००-५००. बोरांचे प्रति किलोचे दर ः चण्यामण्या - १००-१३०, चेकनट ९०-१००, चमेली २८-३२, उमराण १५ ते २० रुपये.

फुलबाजार
दिवाळीनंतर फुलांच्या मागणीत घट झाली असून सध्या फुलांची आवक मध्यम स्वरूपाची आहे. झेंडूचे दर टिकून आहेत. तर इतर सर्व मालाच्या दरामध्ये घट झाली आहे. दर्जादर फुलांना चांगली मागणी आहे.
फुलांचे दर (प्रतिकिलो) : झेंडू : ३०-८०, गुलछडी : ५०-८०, बिजली : ४०-८०, कापरी : १०-५०, शेवंती : ३०-५०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ३०-६०, गुलछडी काडी : १०-५०, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, लिलीबंडल : ८-१२, जर्बेरा : ३०-५०, कार्नेशियन : ८०- १२०़, शेवंती काडी : १००-२००, ऑर्चिड : ३००-४००, ग्लॅडिओ (१० काड्या) ६०-१००.