गवार, टोमॅटो, मटारच्या भावात घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गवार, टोमॅटो, मटारच्या भावात घट
गवार, टोमॅटो, मटारच्या भावात घट

गवार, टोमॅटो, मटारच्या भावात घट

sakal_logo
By

मार्केट यार्ड, ता. १३ : बाजारात रविवारी गवार, टोमॅटो, शिमला मिरची आणि मटारच्या भावात घट झाली असून अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मार्केट यार्डात रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या भाजीपाल्याच्या आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात येथून सुमारे १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतून शेवगा ३ टेम्पो, कर्नाटक येथून ४ ते ५ टेम्पो कोबी, राजस्थानातून २ टेम्पो गाजर, गुजरातमधून २ टेम्पो भुईमूग, कर्नाटक येथून ३ टेम्पो घेवडा, मध्य प्रदेशातून ६ टेम्पो आणि हिमाचल प्रदेशातून १ टेम्पो मटारची आवक झाली तर मध्य प्रदेशातून लसणाची १२ ट्रक आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले १४०० ते १५०० पोती, टोमॅटो अकरा ते बारा हजार क्रेटस, गवार ७ ते ८ टेम्पो, भेंडी ५ ते ६ टेम्पो, हिरवी मिरची ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची १२ टेम्पो, मटार २५ टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, शेवगा २ टेम्पो, कांदा ८० ट्रक, आग्रा, इंदूर आणि पुणे विभागातून बटाटा ४० ट्रक आवक झाली, अशी माहिती मार्केट यार्ड येथील व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव- कांदा : १५०-२८०, बटाटा : १७०-२३०. लसूण : १००-४००, आले सातारी : १५०-३५०, भेंडी : २५०- ३५०, गवार : गावरान व सुरती २००-३००, टोमॅटो : ८०-१००, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : २५०-३००, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : २००-२५०, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी :२००- २५०, पापडी : ३५०-४००, पडवळ : २००-२५०, काकडी : १२०-१६०, फ्लॉवर : ८०-१००, कोबी : १००-१५०, वांगी : २५०-३५०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : ३००-४००, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : १५०- २००, शेवगा : १०००-१२००, गाजर : २००-४००, वालवर : ३५०-४५०, बीट : २८०-३००, घेवडा : २५०-३५०, कोहळा : १००-१५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग : ५००-५५०, मटार : स्थानिक : ७५०- ९००, परराज्य : ७५०-९००, पावटा : ४००- ४५०, तांबडा भोपळा : १००-१५०, कैरी तोतापुरी: ७००, सुरण : २००-२५०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

कोथिंबीर, मेथी, कांदापात आणि पालकच्या भावात घट
गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी गेल्या आठवड्याच्या तुलनेत रविवारी कोथिंबीर, मेथी, कांदापात आणि पालकच्या भावात घट झाली आहे तर अंबाडीच्या भावात वाढ झाली असून अन्य सर्वच पालेभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. कोथिंबिरीच्या दीड लाख गड्ड्यांची आवक झाली तर मेथीच्या ५० हजार गड्ड्यांची आवक झाली. कोथिंबीर आणि कांदापातीच्या भावात गेल्या आठवड्यापेक्षा रविवारी गड्डीमागे दोन रुपयांची घट झाली आहे तर अंबाडीच्या भावात गड्डीमागे एक रुपयांची वाढ झाली.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ३००-१०००, मेथी : ६००-१२००, शेपू : ३००-८००, कांदापात : ६००-१०००, चाकवत : ४००-७००, करडई : ४००- ६००, पुदिना : २००-६००, अंबाडी : ५००-७००, मुळा : ८००-१२००, राजगिरा : ४००-६००, चुका : ५००-१०००, चवळई : ४००-७००, पालक : ८००-१२००.

अननस, डाळिंब, कलिंगडाच्या भावात वाढ
गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी अननस, डाळिंब, कलिंगड, खरबूज, पपई आणि बोरांच्या भावात वाढ झाली असून लिंबू, चिक्कू आणि सफरचंदाच्या भावात घट झाली आहे. तर संत्रा, मोसंबी, सीताफळ आणि पेरूचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. अननसाच्या तीन डझनामागे शंभर रुपये, डाळिंबाच्या भावात १५ ते २० टक्के, कलिंगड, खरबूज आणि पपईच्या भावात प्रत्येकी किलोमागे पाच रुपयांची, तर बोरांच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर लिंबाच्या भावात गोणीमागे १०० ते १५० रुपये, चिक्कू गोणीमागे २०० रुपये, सफरचंदाच्या भावात पेटीमागे १०० रुपयांची घट झाली आहे.

लिंबू दोन ते अडीच हजार गोणी, डाळिंब सुमारे १५ ते २० टन, पपई १० ते १२ टेम्पो, कलिंगड २ ते ३ टेम्पो, खरबूज सुमारे १ ते २ टेम्पो, पेरू १ हजार ते १ हजार २०० क्रेट, अननस ४ ट्रक, मोसंबी ६० ते ७० टन, संत्रा २५ ते २० टन, सीताफळ ५० ते ६० टन, चिक्कू एक हजार बॉक्स इतकी आवक झाली होती.

फळांचे भाव :
लिंबे (प्रति गोणी) : १५०-३००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ७०-२५०, आरक्ता: २०-८०, गणेश : १०-५०, कलिंगड : १५-२५, खरबूज : २५-४०, पपई : १०-३५, अननस (एक डझन) १००-५००, पेरू (२० किलो) २५०- ३५०. मोसंबी (तीन डझन) २४०-४००, (चार डझन) १००-२५०, संत्रा (दहा किलो) २००-७००, सीताफळ (एक किलो) १०-१००, चिक्कू (१० किलो) १५० - ५००.

फुलांची आवक घटली
गेल्या काही दिवसांपासून थंडी सुरू झाली आहे. त्यामुळे फुलांची आवक घटली असून लग्नसराई अद्याप सुरू न झाल्याने फुलांना मागणी कमी असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

प्रतिकिलोचे दर :
झेंडू : ३०-४०, गुलछडी : ४०-५०, कापरी : ३०-४०, शेवंती : २०-३०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-३०, गुलछडी काडी : ५-१०, डच गुलाब (२० नग) : ८०-१००, जर्बेरा : २०-४०, कार्नेशियन : १००-१२०.