कांदा, शिमला मिरची, कोबीच्या भावात घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदा, शिमला मिरची, कोबीच्या भावात घट
कांदा, शिमला मिरची, कोबीच्या भावात घट

कांदा, शिमला मिरची, कोबीच्या भावात घट

sakal_logo
By

मार्केट यार्ड, ता. २० : कांदा, हिरवी मिरची, शिमला मिरची आणि कोबीच्या भावात घट झाली असून अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली़. गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी (ता. २०) राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे ९० ते ९५ ट्रक फळभाज्यांची आवक झाली.
परराज्यांतून झालेल्या भाजी पाल्याच्या आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात येथून सुमारे १० ते १२ टेंपो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूतून शेवगा दोन टेंपो, कर्नाटक येथून चार ते पाच टेंपो कोबी, राजस्थानातून सात ते आठ टेंपो गाजर, गुजरात येथून दोन टेंपो भुईमूग शेंग, कर्नाटक येथून दोन ते तीन टेंपो घेवडा, मध्यप्रदेशातून १२ ते १३ टेंपो मटार, कर्नाटकातून पावट्याची दोन ते तीन टेंपो आवक झाली आहे़, तर मध्यप्रदेशातून लसणाची आठ ते दहा ट्रक इतकी आवक झाली. स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ८०० ते ९०० पोती, टोमॅटो आठ ते नऊ हजार क्रेट, गवार सात ते आठ टेंपो, भेंडी सात ते आठ टेंपो, हिरवी मिरची पाट ते सहा टेंपो, फ्लॉवर १० ते १२ टेंपो, कोबी पाट ते सहा टेंपो, ढोबळी मिरची १० ते १२ टेंपो, तांबडा भोपळा आठ ते १० टेंपो, शेवगा दोन टेंपो, कांदा ५० ते ६० ट्रक, आग्रा, इंदूर आणि पुणे विभागातून बटाटा ५० ते ५२ ट्रक इतकी आवक झाली, अशी माहिती मार्केट यार्ड येथील ज्येष्ठ व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव - कांदा : १००-२००, बटाटा : १४०-२२०. लसूण : १५०-५००, आले सातारी : १००-४००, भेंडी : २५०- ४००, गवार : गावरान व सुरती ३००-५००, टोमॅटो : ८०-१००, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : २००-२५०, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी :१६०-१८०, पापडी : ३००-३५०, पडवळ : २००-२५०, काकडी : १२०-१६०, फ्लॉवर : ८०-१२०, कोबी : ८०-१००, वांगी : २००-२५०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : २००-३००, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १५०-१८०, शेवगा : १०००-१२००, गाजर : ३००-४००, वालवर : ३५०-४००, बीट : २५०-३००, घेवडा : ३००-३५०, कोहळा : १००-१५०, आर्वी:२००-२५०, घोसावळे : २००-२२०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग शेंग : ५००-५५०, मटार : परराज्य: ६००-६५०, पावटा : ५००- ५५०, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

कोथींबीर, मेथी, शेपू महाग
गुलटेकडी येथील मार्केटयार्डात रविवारी गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथींबीर, मेथी, शेपू, कांदापात, करडई, पुदीना, मुळे, राजगिरा, चुका आणि पालकच्या भावात वाढ झाली असून चाकवत, अंबाडी आणि चवळीच्या भावात घट झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली़.
दरम्यान, कोथिंबिरीच्या सव्वालाख गड्ड्यांची आवक झाली तर मेथीच्या ५० हजार गड्ड्यांची आवक झाली़. कोथिंबिरीच्या भावात गेल्या आठवड्यापेक्षा रविवारी गड्डीमागे पाच रुपयांची वाढ झाली आहे. तसेच मेथी आणि मुळा प्रत्येकी चार रुपये, शेपू, कांदापात, पुदीना आणि चुका प्रत्येकी दोन रुपये, करडई, राजगिरा आणि पालक प्रत्येकी एक रुपयाने महागला आहे तर चाकवत, अंबाडी आणि चवळई प्रत्येकी एक रुपयांनी स्वस्त झाली आहे़.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ८००-१५००, मेथी : १२००-१६००, शेपू : ८००-१०००, कांदापात : ८००-१२००, चाकवत : ४००-६००, करडई : ४००- ७००, पुदीना : ३००-८००, अंबाडी : ४००-६००, मुळे : ८००-१६००, राजगिरा : ४००-७००, चुका : ५००-१२००, चवळई : ४००-६००, पालक : ६००-१३००.

लिंबू, पपई, खरबूज महागले
गुलटेकडी येथील मार्केटयार्डात रविवारी लिंबू, पपई आणि खरबूजाच्या भावात वाढ झाली असून पेरूच्या भावात मात्र घट झाली आहे. तर अननस, डाळिंब, संत्री, मोसंबी, बोरे, चिक्कू, कलिंगड आणि सीताफळाचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली़. लिंबाच्या भावात गोणीमागे ५० रुपये, पपई आणि खरबूज प्रतिकिलोस पाच रुपयांनी महागले आहे तर पेरूच्या भावात क्रेटमागे १०० रुपयांनी घट झाली आहे़.

लिंबू दीड ते दोन हजार गोणी, डाळिंब सुमारे २५ ते ३० टन, पपई आठ ते दहा टेंपो, कलिंगड चार ते पाच टेंपो, खरबूज सुमारे सहा ते सात टेंपो, पेरू एक हजार ते दीड हजार क्रेट, अननस पाच ट्रक, मोसंबी ३० ते ४० टन, संत्री २० ते २५ टन, सीताफळ ६० ते ७० टन, चिक्कू दीड हजार बॉक्स इतकी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : २००-४००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ८०-२५०, आरक्ता : ३०-८०, गणेश : २०-६०, कलिंगड : १५-२५, खरबूज : २०-३५, पपई : ५-२५, अननस (एक डझन) १००-४५०, पेरू (२० किलो) २००- ३०० मोसंबी (तीन डझन) २५०-५००, (चार डझन) १५०-२५०, संत्री (दहा किलो) २००-६००, सीताफळ (एक किलो) २०-७०, चिक्कू (१० किलो)१००-५००

फुलांना मागणी वाढली
गेल्या काही दिवसांपासून फूलबाजारात मंदीचे वातावरण होते़ मात्र अवघ्या काही दिवसांपासून मार्गशीर्ष महिना सुरु होत असल्याने फूलबाजारात काहीशी
मागणी वाढत चालली आहे़ शोभीवंत फुलांना चांगली मागणी आहे़ तर इतर फुलांची मागणी वाढत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली़. प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-३०, गुलछडी : २०-५०, अष्टर : जुडी : १०-२०, कापरी : २०-३०, शेवंती : २०-५०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-३०, गुलछडी काडी : ५०-१२०, डच गुलाब (२० नग) : ६०-२२०, जरबेरा : ३०-६०, कार्नेशियन : १५०-२००.