मार्गशीर्षात मासळीची मागणी घटली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मार्गशीर्षात मासळीची मागणी घटली
मार्गशीर्षात मासळीची मागणी घटली

मार्गशीर्षात मासळीची मागणी घटली

sakal_logo
By

मार्केट यार्ड, ता. ४ : देशाच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टीवरून मासळीची आवक बाजारात होत आहे. मार्गशीर्ष महिना सुरू झाल्याने मासळीला मागणी घटली आहे. मागणीनुसार आवक मागविली जात असल्याने सर्व प्रकारच्या मासळीचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर होते. केवळ लहान आकाराच्या बोंबील, बांगडा, कोळंबीच्या दरात काहीशी घट झाली होती. तर मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे मटण, चिकन, गावरान अंड्याचे दर स्थिर होते. इंग्लिश अंड्यांच्या दरात शेकड्यामागे २० ते ३० रुपये तर प्रतिनगामागे एका रुपयाची वाढ झाली होती.
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. ४) खोल समुद्रातील मासळीची १० ते १५ टन, खाडीची २०० ते ३०० किलो, तर नदीच्या मासळीची २०० ते ३०० किलो इतकी आवक झाली. आंध्रप्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे १५ ते १८ टन इतकी आवक झाली, अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी, चिकन-अंड्यांचे व्यापारी रूपेश परदेशी आणि मटणाचे विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर)- पापलेट : कापरी : १४००-१५००, मोठे : १४००-१५००, मध्यम : ९००-१०००, लहान : ७००-८००, भिला : ५००-५५०, हलवा : ५५०-६००, सुरमई : ४४०-५५०, रावस : ६००-६५०, घोळ : ७५०-८००, करली : २८०-३२०, करंदी (सोललेली) : ४००-४४०, भिंग : ४००-४४०, पाला : ९००- १०००, वाम : ६५०-७००, ओले बोंबील : १२०-१६०. कोळंबी : लहान १८०-३२०, मोठी : ३८०-५५०, जंबोप्रॉन्स : १२००, किंगप्रॉन्स : ७००-७५०, लॉबस्टर : १७००- १८००, मोरी : २४०-२८०, मांदेली : १००-१४०, राणीमासा : १२०-१६०, खेकडे : २८०-३२०, चिंबोर्‍या : ४८०-५५०. खाडीची मासळी : सौंदाळे : २००-२४०, खापी : १४०-१६०, नगली : ३६०-४००, तांबोशी : ४००-४८०, पालू : २४०-२८०, लेपा : १८०-२४०, बांगडा : १००-१६०, शेवटे : २४०-२८०, पेडवी : १००-१२०, बेळुंजी : १२०-१६०, खुबे : १२०-१४०, तारली : १२०-१६०. नदीतील मासळी : रहू : १४०-१८०, कतला : १६०-१८०, मरळ : ४००-४४०, शिवडा : २००-२४०, खवली : २२०-२४०, आम्ळी : १४०-१८०, खेकडे : ३६०-४००, वाम : ५००-५५०. मटण: बोकडाचे :७००, बोलाई: ७००, खिमा :७००, कलेजी : ७४०, चिकन: २००, लेगपीस : २६०, जिवंत कोंबडी: १४०, बोनलेस : ३००. अंडी : गावरान (शेकडा) ९३०, डझन १२०, प्रतिनग १०. इंग्लिश (शेकडा) ५९०, डझन ८४, प्रतिनग ७.
--------------