हमाल तोलणार कामगारांच्या प्रश्‍नाबाबत उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हमाल तोलणार कामगारांच्या
प्रश्‍नाबाबत उपोषण
हमाल तोलणार कामगारांच्या प्रश्‍नाबाबत उपोषण

हमाल तोलणार कामगारांच्या प्रश्‍नाबाबत उपोषण

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : हमाल पंचायतीने मार्केटयार्डातील माथाडी मंडळासमोर हमाल, तोलणार, कामगारांच्या प्रश्नांबाबत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. हमाल पंचायतद्वारा पुणे येथील विविध आस्थापनाचे हमाली दरवाढीचे करार दोन ते तीन वर्षांपासून झालेले नाहीत. याबाबत २४ नोव्हेंबर रोजी पुणे माथाडी मंडळ येथे बैठक घेऊन काही आस्थापनाचे काही करार मान्य केले होते.

ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणास कामगार युनियन, टेम्पो पंचायत, महात्मा फुले संघटना, किरकोळ व्यापारी संघटना आदींनी पाठिंबा दिला आहे. यावेळी संतोष नांगरे, संजय सासटे, राजू पवार, विष्णू गरजे, चंद्रकांत मानकर, विनोद शिंदे, विनायक ताकवले, दत्ता डोंबाळे आदी उपस्थित होते. या उपोषणास गोरख मेंगडे, हनुमंत बहिरट, राजेंद्र चोरघे, किशोर भानुसघरे यांच्यासह अन्य जण सहभागी झाले आहेत.

दरवाढ कराराच्या बैठकीला (ता. १) मालक वर्ग अनुपस्थित राहिल्याने माथाडी मंडळाकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाही. तसेच भुसार तोलणार कामगारांचा प्रश्न न्यायालयात असल्यामुळे त्यांना पॅकिंग मालावर तोलाई मिळत नसल्याने गेल्या चार वर्षांपासून त्यांची उपासमार होत आहे. त्या अनुषंगाने माजी पणन मंत्री बाजार समिती व कामगार प्रतिनिधी यांच्या दरम्यान झालेल्या चर्चेत भुसार
तोलणारांना अन्य ठिकाणी काम देऊन त्यांची उपासमार थांबवावी, असे आदेश दिले होते. त्यानुसार बाजार समितीने भुसार विभागातील दहा तोलणार कामगारांना फळे भाजीपाला विभागात न्यायालयीन निकाल येईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात तोलाईचे काम करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार माथाडी मंडळाच्या नियमानुसार एका टोळीतून दुसऱ्या टोळीत समाविष्ट करण्यासाठी एक तृतीयांश कामगारांच्या सह्या उपलब्ध करून द्याव्या लागतात. या सह्या उपलब्ध करून दिल्या असताना पुणे माथाडी मंडळाने त्याची पडताळणी करून २४ नोव्हेंबर रोजी नोटीसद्वारे संबंधित तोलणार कामगारांना त्यांच्या सह्यांबाबत म्हणणे मांडण्यासाठी पुणे माथाडी येथील कार्यालयात येण्यास सांगितले होते. अनेक तोलणारांनी येऊन संबंधित भुसार तोलणार यांना मान्यता दिली, असे असतानाही केवळ एका संघटनेच्या दबावाखाली त्यांचे वर्गीकरण करत नसल्याने आरोप हमाल पंचायतीच्या वतीने करण्यात आला आहे.