हिरवी मिरचीच्या भावात वीस टक्क्यांनी वाढ

गुलटेकडी मार्केटयार्ड ः राज्यासह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक

हिरवी मिरचीच्या भावात वीस टक्क्यांनी वाढ गुलटेकडी मार्केटयार्ड ः राज्यासह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक

मार्केट यार्ड, ता. ५ : बाजारात फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत कमी झाली. हिरवी मिरची आणि ढोबळी मिरचीचे भाव वगळता इतर सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर होते. हिरवी मिरचीच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत दहा ते वीस टक्क्यांनी वाढ तर ढोबळी मिरचीच्या भावात दहा वीस टक्क्यांनी घट झाली होती.

गुलटेकडी मार्केटयार्डमध्ये रविवारी (ता. ५) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या भाजीपाल्याच्या आवकेमध्ये बंगळूर येथून २ टेम्पो आलं, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथून ५ ते ६ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक आणि गुजरात येथून ३ ते ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू २ ते ३ टेम्पो शेवगा, राजस्थानातून ९ ते १० टेम्पो गाजर, कर्नाटक येथून ३ ते ४ टेम्पो घेवडा, गुजरात येथून २ टेम्पो भुईमूग शेंग, मध्य प्रदेशातून २४ ते २५ टेम्पो मटार, कर्नाटक येथून ३ ते ४ टेम्पो पावटा, कर्नाटक येथून १०० क्रेट्स वैरी, मध्य प्रदेश येथून ९ ते १० ट्रक लसूण इतकी आवक झाली. स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ८०० ते ९०० पोती, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो १० ते १२ हजार क्रेट्स, हिरवी मिरची ५ ते ६ टेम्पो, काकडी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, तांबडा भोपळा ७ ते ८ टेम्पो, कांदा ७० ते ७५ ट्रक, इंदूर आणि स्थानिक भागातून बटाटा ३० ट्रक इतकी आवक झाली, अशी माहिती मार्केटयार्ड येथील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव - कांदा : १००-१३०, बटाटा : १००-१६०. लसूण : २००-७००, आले सातारी : २५०-४००, आले बंगळूर : ३००-४००, भेंडी : ४००- ६००, गवार : गावरान व सुरती ६००-८००, टोमॅटो : ८०-१२०, दोडका : ३५०-४००, हिरवी मिरची : ४००-४५०, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २५०-३००, काकडी १३०-१५०, कारली : हिरवी २४०-२५०, पांढरी : १८०- २००, पापडी : ३५०-४००, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १००-१६०, कोबी : ४०-६०, वांगी : २५०-४००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ७०-८०, ढोबळी मिरची : ३००-३५०, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : ६००-८००, गाजर : १५०-२००, वालवर : ३००-३५०, बीट : ७०-८०, घेवडा : २५०-३५०, कोहळा : १००-१५०, आर्वी: २००-२५०, घोसावळे : ३५०-४००, ढेमसे : २००-२५०, भुईमूग शेंग : ५००-६००, मटार : परराज्य: १८०-२५०, पावटा : ३००- ५००, तांबडा भोपळा : १००-१५०, तोतापुरी वैरी : १३००-१४००, सुरण : २००-२२०, मका कणीस : ५०- १००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
--------
मेथीची ५० हजार गड्डी इतकी आवक
रविवारी बाजारात कोथिंबिरीची दीडलाख गड्डी व मेथीची ५० हजार गड्डी इतकी आवक झाली. आवक वाढल्याने घाऊक बाजारात मुळे, कोथिंबिरीच्या भावात गड्डीमागे ५ रुपये, कांदापात २ रुपये, तर, मेथी, शेपू, चाकवत, अंबाडीच्या भावात एक रुपयाने घट झाली होती. इतर सर्व पालेभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापारी अमोल घुले यांनी दिली.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव - कोथिंबीर : ६००-१०००, मेथी : ५००-७००, शेपू : ४००-६००, कांदापात : ५००-८००, चाकवत : ४००-६००, करडई : ४००- ६००, पुदीना : २००-५००, अंबाडी : ४००- ६००, मुळे : ४००-१०००, राजगिरा : ४००-६००, चुका : ४००-७००, चवळई : ३००-६००, पालक : ४००-८००, हरभरा गड्डी ३००-१०००.

कलिंगड, खरबूज व पपईची आवक मोठ्या प्रमाणात
फळबाजार ः बाजारात कलिंगड, खरबूज व पपईची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातुलनेत मागणीही अधिक असल्याने गतआठवड्याच्या तुलनेत भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने बाजारातील बोरांची आवक घटली आहे. परिणामी, बोरांच्या भावात वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. थंडीमुळे पेरू खरेदीकडे खरेदीदारांनी पाठ फिरविली आहे. पेरूच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. अन्य सर्व फळांची आवक जावक कायम असून गत आठवड्यातील दर टिकून असल्याचे सांगण्यात आले.

रविवारी (ता. ५) मार्केटयार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस ६ ट्रक, संत्री २० ते २५ टन, मोसंबी ४५ ते ५० टन, डाळिंब २५ टन, पपई १५ ते १० टेम्पो, लिंबे सुमारे २ हजार ते २ हजार ५०० गोणी, पेरू १५० ते २०० क्रेटस, कलिंगड २५ ते ३० गाड्या, खरबूज १० ते १५ गाड्या, बोरे १५० पोती, किन्नू चार ते पाच हजार बॉक्स व सफरचंदाची दोन ते अडीच हजार पेटी इतकी आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे - लिंबे (प्रति गोणी) : ४००-७००, अननस : १००-५००, मोसंबी : (३ डझन) : १५०-३००, (४ डझन) : ४०-१५०, संत्री : (१० किलो) : २००-७००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ८०-२००, गणेश : १०-४०, आरक्ता २०-८०. कलिंगड : ५-१०, खरबूज : १०-३०, पपई : ५-२०, पेरू (२० किलो) : १००-३५०, चिक्कू (१० किलो) : ८०-५००, बोरे (१० किलो) : चेकनट : ७००-९००, उमराण : ८०-१४०, चमेली : २८०-३२०, चण्यामण्या : ६५०-७५०. सफरचंद : काश्मीर डेलिशिअस (१५ ते १६ किलो) १०००-१४००, किन्नोर : २०००-२२००. किन्नू (१० ते ११ किलो) ६५०-७५०.

लग्नतिथीमुळे फुलांची उलाढाल वाढली ; दरात १० टक्क्यांनी वाढ
गणेश जयंतीनंतर फुलांची मागणी घातली होती. सध्या लग्न सराई सुरू झाल्याने मागणी वाढली आहे. रविवारी मार्केट यार्डातील फूलबाजारात फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली. लग्न तिथींमुळे फुलांची उलाढाल वाढली असून शोभेच्या फुलांना चांगली मागणी आहे. त्यामुळे एकूणच सर्व प्रकारच्या फुलांच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली होती, अशी माहिती फूल बाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी दिली.
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-५०, गुलछडी : ३००-४००, अष्टर : जुडी १०-२०, सुट्टा ८०-१२०, कापरी : १०-४०, शेवंती : ५०-८०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-३०, गुलछडी काडी : ४०-१००, डच गुलाब (२० नग) : १००-३००, जर्बेरा : ३०-५०, कार्नेशियन : १५०-२००, शेवंती काडी १५०-२५०, लिलियम (१० काड्या) ८००-१०००, ऑर्चिड ४००-५००, ग्लाडिओ (१० काड्या) : ८०-१००, जिप्सोफिला : ३००-५००, मोगरा : १०००-१२००.

PNE23T22780
PNE23T22777

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com