साबुदाणा,शेंगदाणा दरात वाढ; भगर स्थिर

साबुदाणा,शेंगदाणा दरात वाढ; भगर स्थिर

भगर, साबुदाणा, शेंगदाण्याच्या मागणीत वाढ
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर खरेदी; भावात किंचित वाढ

पुणे, ता. १५ : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भगर, साबुदाणा, शेंगदाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. मागणीमुळे साबुदाणा आणि शेंगदाण्याच्या भावात वाढ झाली आहे. भगरीचे भाव स्थिर आहेत. तर मागील वर्षीच्या तुलनेत साबुदाण्याच्या क्विंटलच्या भावात ८०० ते १००० आणि शेंगदाण्याच्या १५०० ते २००० रुपयांनी वाढ झाली आहे, तर भगरीचे दर स्थिर आहेत.
ग्राहकांकडून होणारी मागणी अपेक्षित धरून व्यापारी मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करून ठेवत असतात. यंदाही साबुदाणा, भगर आणि शेंगदाण्याची व्यापाऱ्यांनी खरेदी करून ठेवली होती. त्या तुलनेत मागणीही चांगली होती, असे व्यापारी अशोक लोढा यांनी सांगितले.
दरवर्षी सुमारे जून ते नोव्हेंबरपर्यंत शेंगदाण्याला अधिक मागणी असते. घरात आणि हॉटेलसह खाद्यपदार्थ तयार करण्यात येणाऱ्या विविध केंद्रावर शेंगदाणा तेलाचा वापर वाढला आहे. ग्राहकांकडून शेंगदाण्याला कायम मागणी होत असल्याचे व्यापारी नितीन चोरडिया यांनी सांगितले. शनिवारी महाशिवरात्री असल्याने उपवासाच्या पदार्थांमध्ये मागणीत वाढ झाली आहे. मार्केटयार्डातील भुसार बाजारात तमिळनाडू येथून साबुदाण्याची आवक होते. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात येथून शेंगदाण्याची आवक होते. तर नाशिक येथून भगरची आवक होते. यंदा भगरीचे उत्पादन चांगले आहे. तसेच मागणीही जास्त आहेत.

भगरीला यंदा तृणधान्य म्हणून घोषित केले आहे. सध्या भगरीला इतर देशांतूनही मागणी चांगली आहे. बाजारात भगर, साबुदाणाही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. यंदा साबुदाण्याच्या उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी घट झाली आहे.
- आशिष दुगड, व्यापारी, मार्केट यार्ड

घाऊक बाजारातील क्विंटल भाव
वस्तू घाऊक भाव -- किरकोळ भाव
फेब्रुवारी २०२२ - फेब्रुवारी २०२३
भगर १०८०० ते ११०० -- १०८०० ते ११०००
साबुदाणा ५८०० ते ६००० -- ६८०० ते ७०००
घुंगरू शेंगदाणा ९८०० ते १०५०० -- ११८०० ते १२१००
स्पॅनिश शेंगदाणा १०००० ते १०५००--१२८०० ते १३५००

किरकोळ बाजारातील किलोचा भाव
घुंगरू शेंगदाणा - ११० ते १३० रुपये
स्पॅनिश शेंगदाणा - १३० ते १४० रुपये
भगर - १२० ते १३५ रुपये
साबुदाणा ८५ ते ९० रुपये

भावात का झाली वाढ?
- गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर शेंगदाणा निर्यात
- साबुदाणा, शेंगदाण्याच्या उत्पादनात यंदा घट
- उत्पादक राज्यात हवामानातील बदल
- जास्तकाळ रेंगाळलेला पाऊस
- शेंगदाण्याच्या हंगामाचा अखेरचा टप्पा सुरू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com