टोमॅटो, हिरवी मिरची, घेवड्याच्या भावात वाढ

टोमॅटो, हिरवी मिरची, घेवड्याच्या भावात वाढ

मार्केट यार्ड, ता. ५ : फळभाज्यांची आवक वाढली आहे; मात्र तुलनेने मागणीही वाढल्याने टोमॅटो, हिरवी मिरची आणि घेवड्याच्या भावात वाढ झाली तर शेवगा आणि तोतापुरी कैरीच्या भावात घट झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
येथील बाजारात रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या भाजीपाल्याच्या आवकेमध्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक आणि गुजरातमधून चार टेम्पो कोबी, राजस्थान येथून आठ ट्रक गाजर, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूतून पाच टेम्पो शेवगा, गुजरातमधून दोन टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटक येथून पाच टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून तोतापुरी कैरी सहा टेम्पो, मध्य प्रदेशातून १२ ट्रक मटार, मध्यप्रदेशातून लसणाची १६ टेम्पो आवक झाली.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १००० पोती, टोमॅटो १२ हजार पेटी, गवार आणि भेंडी प्रत्येकी सहा टेम्पो, हिरवी मिरची पाच टेम्पो, काकडी आठ टेम्पो, फ्लॉवर १२ टेम्पो, कोबी सहा टेम्पो, सिमला मिरची १२ टेम्पो, तांबडा भोपळा १२ टेम्पो, कांदा ८० ट्रक, आग्रा, इंदूर, गुजरात आणि स्थानिक भागातून बटाट्याची ५० ट्रक आवक झाली.
फळभाज्यांचे १० किलोचे भाव- कांदा : ८०-१३०, बटाटा : ८०-१४०, लसूण : २५०-७००, आले सातारी : ३००-५००, भेंडी : ४००-६००, गवार : गावरान व सुरती ः ६००-८००, टोमॅटो : १००-१६०, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : ३५०-४५०, दुधी भोपळा : ८०-१५०, चवळी : २५०-३००, काकडी ः १६०-२००, कारली : हिरवी ः २५०-३००, पांढरी : २००-२५०, पापडी : ३००-३५०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १००-१४०, कोबी : ६०-८०, वांगी : १००-२००, डिंगरी : २५०-३००, नवलकोल : ६०-८०, ढोबळी मिरची : ३५०-४००, तोंडली : कळी ः ३००-३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : २५०-३००, गाजर : १६०-२००, वालवर : ३००-३५०, बीट : ६०-८०, घेवडा : ४५०-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : ३००-३५०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग शेंग : ५००-६००, मटार : परराज्य : २४०-२६०, पावटा : २५०-३५०, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

मेथी, शेपू, अंबाडीच्या भावात घट
मार्केट यार्ड : पालेभाज्यांची आवक वाढली आहे. त्यातुलनेत मागणी कमी असल्यामुळे मेथी, शेपू, चाकवत आणि अंबाडीच्या भावात घट झाली असून कांदापात आणि करडईच्या भावात वाढ झाली आहे तर कोथींबीर, पुदीना, मुळे, राजगिरा, चुका, चवळई आणि पालकचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी
दिली.
बाजारात रविवारी कोथिंबिरीची एक लाख ५० हजार जुडींची आवक झाली. तर मेथीची ८० हजार जुडी आवक झाली. घाऊक बाजारात मेथी, शेपू, चाकवत आणि अंबाडीच्या भावात गड्डीमागे प्रत्येकी एक रुपयांनी घट झाली तर कांदापात आणि करडईच्या भावात एक रुपयांनी वाढ झाली.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ३००-८००, मेथी : २००-६००, शेपू : ३००-५००, कांदापात : ४००-८००, चाकवत : ३००-५००, करडई : ३००-६००, पुदीना : २००-४००, अंबाडी : ३००-५००, मुळे : ५००-८००, राजगिरा : ३००-५००, चुका : ३००-६००, चवळई : ३००-५००, पालक : ३००-८००.

फळबाजार
लिंबू, कलिंगड, खरबुजाच्या भावात वाढ
उन्हाच्या कडाका वाढला आहे. त्यामुळे थंड आणि रसाळ फळांना मागणी वाढली आहे. परिणामी कलिंगड, खरबूज आणि लिंबाच्या भावात वाढ झाली आहे तर पपईची आवक घटल्याने भावात वाढ झाली आहे. सफरचंदाच्या भावात घट झाली असून चिक्कू, अननस, डाळिंब, संत्रा, मोसंबी आणि द्राक्षांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
फळबाजारात संत्री ५० टन, मोसंबी ३५ टन, डाळिंब २५ टन, पपई सहा टेम्पो, लिंबे दोन हजार गोणी, कलिंगड २० गाड्या, खरबूज सहा गाड्या तर द्राक्षांची २० टन आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे- लिंबे (प्रति गोणी) : ४००-१५००, मोसंबी : (३ डझन) : २२०-४५०, (४ डझन) : ८०-२२०, संत्रा : (१० किलो) : २००-८००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ६०-२५०, गणेश : १०-४०, आरक्ता ः २०-८०. कलिंगड : १०-१३,
खरबूज : १८-२२, पपई : १२-२५, द्राक्षे (१० किलो) सुपर सोनाका ः ४००-६००, सोनाका ः ३५०-५५०, जम्बो ः ५५०-७००, शरद ः ४००-६००. माणिकचमण (१५ किलो) ः ४००-५००, थॉमसन (१५ किलो) ः ३५०-५००.

होळीमुळे फुलांना मागणी
मार्केट यार्ड : होळीमुळे फुलांना मागणी वाढली आहे; मात्र आवकेच्या तुलनेत मागणी असल्याने दर स्थिरच असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-५०, गुलछडी : ८०-१४०, अष्टर : जुडी ५-१०, सुट्टा २०-४०, कापरी : २०-४०, शेवंती : ४०-६०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-३०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ५०-८०, जर्बेरा : १०-३०, कार्नेशियन : ५०-८०, शेवंती काडी १००-२००, लिलियम (१० काड्या) ८००-१०००, आॅर्चिड ः ४००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ५०-६०, जिप्सोफिला : १००-२००, मोगरा : २५०-३००.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com