खजूरचे ५० पेक्षा अधिक प्रकार बाजारात

खजूरचे ५० पेक्षा अधिक प्रकार बाजारात

मार्केट यार्ड, ता. २४ : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यास प्रारंभ झाला आहे. शहरातील विविध बाजारपेठा सजू लागल्या आहेत. रमजानचा उपवास खजूर खाऊन सोडण्याची परंपरा आहे. त्या पार्श्वभूमीवर बाजारात ५० पेक्षा जास्त प्रकारचे खजूर उपलब्ध आहेत.

बाजारात लाल खजूर आणि काळे खजूर उपलब्ध असून लाल खजूर साधारणतः ७० ते १०० रुपये प्रति किलो, तर काळे खजूर सौदी १५० ते ५५० रुपये प्रति किलो आहेत. तर स्पेशल खजूर अरेबियन ६०० ते १२०० रुपये प्रति किलो बाजारात उपलब्ध आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा खजुराच्या किमती ५ ते १० टक्क्यांनी घटल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापारी राजेश गोयल यांनी दिली.

५० पेक्षा जास्त प्रकारची खजूर
बाजारात अजवा, मगजोल, बुमेन, फर्द, किमिया, फरत, सुलतान, बुरारी, कलमी, मदिना, रुकसार, हसना, हार्मोनिअम, मुज्जरब, गुड, अल्जेरियन यासह ५० पेक्षा जास्त खजुरचे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.

या देशातून आयात होतात खजूर
इराण, इराक, सौदी, दुबई, ओमन, मस्कत या आखाती देशातून खजूर भारतात आयात केले जातात.

दृष्टिक्षेपात
- राज्यात दररोज दीड ते दोन हजार टन खजुरची अवाक
- उत्पादन वाढल्याने मागील वर्षीच्या तुलनेत स्वस्त
- मदिना येथून आलेल्या खजुराला विशेष पसंती

सामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंत खजूर खरेदी करू शकतील, अशा सगळ्या प्रकारचे खजूर बाजारात उपलब्ध आहेत. काळ्या खजुरामध्ये विविध प्रकारच्या पॅकिंगला सर्वाधिक मागणी आहे. अजवा आणि मगजोल खजुराला जास्त मागणी आहे. काळे खजूर ही आखाती देशांतून आयात केले जाते.
- आयुष गोयल, व्यापारी, मार्केट यार्ड

मार्केट यार्डात खजूर खरेदीसाठी कोंढवा, हडपसर, खेड शिवापूर, खडकी, पिंपरी - चिंचवड, लोणावळा, अहमदनगर आदी भागातून ग्राहक येतात. अजवा, मगजोल आणि बुमेन हे खजूर आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आणि चवीलाही उत्कृष्ट असल्याने त्यांना जास्त मागणी आहे.
- शुभम गोयल, व्यापारी, मार्केट यार्ड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com