बाजारात १२५ ट्रक शेतमालाची आवक

बाजारात १२५ ट्रक शेतमालाची आवक

मार्केट यार्ड, ता. २६ : गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी १२५ ट्रक शेतमालाची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक वाढली असली तरी मागणी असल्याने सर्व भाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तराखंड आणि गुजरात येथून सुमारे १५ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून ४ टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून ४ टेम्पो शेवगा, राजस्थान येथून ५ ट्रक गाजर, गुजरात येथून २ टेम्पो भुईमूग शेंगा, मध्यप्रदेशातून मटार १ ट्रक, कर्नाटकातून ५ तर आंध्रप्रदेशातून १० टेम्पो तोतापुरी कैरी, मध्यप्रदेश आणि गुजरात येथून लसूण सुमारे १० ट्रक आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे एक हजार गोणी, टोमॅटो सुमारे १० हजार क्रेट, कोबी आणि काकडी प्रत्येकी ८ टेम्पो, काकडी, भेंडी आणि गवार प्रत्येकी सुमारे ५ टेम्पो, सिमला मिरची आणि फ्लॉवर प्रत्येकी १० टेम्पो, कांदा सुमारे १५० ट्रक, इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून बटाटा ४० ट्रक आवक झाली होती.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव - कांदा : ८०-१००, बटाटा : ६०-१२०. लसूण : ३००-६००, आले : ३००-६००, भेंडी : ३००- ५००, गवार : गावरान व सुरती ७००-१०००, टोमॅटो : १२०-१८०, दोडका : ३५०-५००, हिरवी मिरची : ३००-५००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : ३००-३५०, कारली : हिरवी २८०-३००, पांढरी : १८०-२००, पापडी : ३००-३५०, पडवळ : २००-२५०, काकडी : १५०-२००, फ्लॉवर : १००-१६०, कोबी : ६०-१००, वांगी : १००-२००, डिंगरी : २५०-३००, नवलकोल : ७०-८०, ढोबळी मिरची : ३००-३५०, तोंडली : कळी ३००-४००,जाड : १५०-२००, शेवगा : ३००-३५०, गाजर : राजस्थान - २००-२५०, स्थानिक १००-१५० वालवर : ३००-३५०, बीट : ८०-१००, घेवडा : ४००-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी :२००-२५०, घोसावळे : ३००-३५०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग शेंग : ५००-६००, मटार : स्थानिक ६००-६५०, परराज्य २००-३००, पावटा : ३००- ३५०, तांबडा भोपळा : १००-१५०, कैरी तोतापुरी - आंध्रप्रदेश १५०-२००, कर्नाटक २५०-३००, सुरण : २००-२२०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या
कोथींबीर जुडी मागे तीन रुपयांनी वाढली आहे. तर उर्वरित भाज्यांचे तर स्थिर आहेत. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड लाख, मेथीची ६० हजार जुड्या आवक झाली.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ६००-१०००, मेथी : ५००-७००, शेपू : ५००-७००, कांदापात : ४००-७००, चाकवत : ३००-५००, करडई : ३००- ५००, पुदीना : २००-४००, अंबाडी : ४००-७००, मुळे : ४००-७००, राजगिरा : ३००-६००, चुका : ३००-६००, चवळई : ३००-५००, पालक : ५००-७००.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com