बहुतांश भाजीपाल्याचे भाव स्थिर

बहुतांश भाजीपाल्याचे भाव स्थिर

मार्केट यार्ड, ता. ३० : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. बहुतांश भाजीपाल्याची आवक आणि मागणी स्थिर राहिल्याने भाव देखील स्थिर होते.

विविध भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, गुजरात येथून सहा टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटकातून पाच टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून तीन टेम्पो शेवगा, हिमाचल प्रदेशमधून पाच ट्रक मटार, कर्नाटकातून तोतापुरी कैरी पाच टेम्पो, मध्य प्रदेशातून लसणाची १५ टेम्पो आवक झाली. तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे एक हजार ५०० गोणी, गवार, कोबी आणि भेंडी प्रत्येकी पाच टेम्पो, टोमॅटो सुमारे आठ हजार क्रेट्स, हिरवी मिरची तीन टेम्पो, काकडी आठ टेम्पो, फ्लॉवर, तांबडा भोपळा आणि सिमला मिरची प्रत्येकी १० टेम्पो, शेवगा तीन टेम्पो, गाजर सहा टेम्पो, मटार १०० गोणी, कांदा सुमारे १०० ट्रक, इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून बटाट्यांची ४० ट्रक आवक झाली.

फळभाज्यांचे १० किलोचे भाव- कांदा : ७०-१००, बटाटा : १२०-१५०, लसूण : ३००-८००, आले : ६००-१०००, भेंडी : २५०-३००, गवार : गावरान ः ६५०-७५०, सुरती ः ४५०-५५०, टोमॅटो : ६०-९०, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : २००-२५०, दुधी भोपळा : ८०-१००, चवळी : २००-२५०, काकडी : १००-१२०, कारली : हिरवी ः २००-२२०, पांढरी : २५०-२८०, पापडी : २००-३००, पडवळ : ५००-५५०, फ्लॉवर : ६०-९०, कोबी : ५०-८०, वांगी : १००-१२०, डिंगरी : २५०-३००, नवलकोल : १५०-१८०, ढोबळी मिरची : २००-२५०, तोंडली : कळी ः २००-२५०, जाड : १००-१५०, शेवगा : १५०-२५०, गाजर : १००-१२०, वालवर : ३००-३५०, बीट : ८०-१००, घेवडा : ४००-४५०, कोहळा : १२०-१४०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २००-२२०, भुईमूग शेंग : ३५०-४००, मटार : ५५०-६५०, पावटा : ४५०-५००, तांबडा भोपळा : ६०-८०, कैरी तोतापुरी ः २००-२५०, कैरी गावरान : १६०-२२०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या
कोथिंबिरीच्या एक लाख जुड्या
कोथिंबिरीची रविवारी एक लाख तर मेथीची ५० हजार जुडी आवक झाली.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : १०००-१६००, मेथी : १०००-१५००, शेपू : ५००-८००, कांदापात : ६००-१०००, चाकवत : ५००-७००, करडई : ३००-६००, पुदीना : ३००-५००, अंबाडी : ३००-६००, मुळे : ६००-१०००, राजगिरा : ४००-७००, चुका : ५००-८००, चवळई : ३००-७००, पालक : ८००-१०००.


फळबाजार
उन्हाळ्याच्या वाढत्या तडाख्यामुळे कलिंगड, खरबूज अशा रसदार फळांची वाढलेली मागणी कायम आहे. विविध फळांच्या आवकेमध्ये संत्री दोन टन, मोसंबी २५ टन, डाळिंब ३० टन, पपई पाच टेम्पो, लिंबांची सुमारे दोन हजार गोणी, कलिंगड ३० टेम्पो, खरबूज २५ टेम्पो, पेरू ६०० क्रेट्स, चिक्कू दीड हजार डाग, कोकणच्या तयार पिकलेल्या हापूस आंब्याची बाजारात अद्याप टंचाई असल्याने भाव वाढलेले होते. कच्या कैऱ्यांची सुमारे तीन हजार पेटी आवक झाली होती. तर कर्नाटकमधून विविध आंब्याच्या वाणांच्या करंड्या, पेट्या आणि बॉक्सची सुमारे ३० हजार आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ३००-८००, मोसंबी : (३ डझन) : २६०-३८०, (४ डझन) : १२०-२५०, संत्रा : (१० किलो) : ५००-१५००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ३०-१६०, गणेश : ५-२५, आरक्ता १०-४०, कलिंगड : ८-१२, खरबूज : १२-१८, पपई : १०-२२, अननस (एक डझन) : १००-५००, पेरू (२० किलो) : २५०-४००, चिक्कू (१० किलो) : १००-५००. कर्नाटक आंबा ः हापूस ः ३०० ते ५०० डझन, ६० ते ८० रुपये किलो. पायरी ः २५०-३५० डझन, ३०-५० रुपये किलो. लालबाग ः ३० ते ४० रुपये किलो, बदाम बैगणपल्ली ः ३० ते ४० किलो, केशर ः ७० ते १०० रुपये किलो, कोकण हापूस ः ५ ते ९ डझन (कच्चा) दोन हजार ते ३,५००, तयार आंबा पिकलेला ः तीन ते पाच हजार रुपये.

फुलबाजार
कट फ्लॉवरला मागणी
लग्नसराईमुळे कट फ्लॉवरला मागणी वाढली असून भाव १० टक्क्यांनी वाढले होते.
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-५०, गुलछडी : ६०-१००, अष्टर : जुडी ः २०-३०, सुट्टा ः १००-१५०, कापरी : ३०-४०, शेवंती : ८०-१००, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-३०, गुलछडी काडी : २०-८०, डच गुलाब (२० नग) : ७०-१५०, जर्बेरा : १०-३०, कार्नेशियन : १००-१५०, शेवंती काडी ः १५०-२५०, लिलियम (१० काड्या) ः ८००-१२००, ऑर्चिड ः ४००-६००, ग्लाडिओ (१० काड्या) : ५०-१००, जिप्सोफिला : ४००-५००, मोगरा : ३००-६००.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com