टोमॅटो, हिरवी मिरची, शेवग्याच्या भावात घट

टोमॅटो, हिरवी मिरची, शेवग्याच्या भावात घट

मार्केट यार्ड, ता. ७ : ठिकठिकाणी झालेल्या पावसामुळे श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत काही प्रमाणात आवक घटली आहे. टोमॅटो, हिरवी मिरची, शिमला मिरची आणि शेवग्याच्या भावात घट झाली असून घेवड्याच्या भावात मात्र वाढ झाली आहे. अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गुलटेकडी मार्केटयार्डमध्ये रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, गुजरातमधून १२ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक आणि गुजरातमधून चार टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून सहा टेम्पो शेवगा, हिमाचल प्रदेशमधून सहा टेम्पो मटार, तमिळनाडूतून तोतापुरी कैरी पाच टेम्पो तर लसूणाची १० टेम्पो इतकी आवक झाली. स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले ९०० गोणी, गवार सहा टेम्पो, भेंडी पाच टेम्पो, टोमॅटो १२ हजार क्रेट्स, हिरवी मिरची पाच टेम्पो, काकडी १० टेम्पो, फ्लॉवर टेम्पो, कोबी पाच टेम्पो, सिमला मिरची १२ टेम्पो, शेवगा चार टेम्पो, गाजर सहा टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, कांदा सुमारे १०० ट्रक, इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून बटाट्याची ४५ ट्रक आवक झाली, अशी माहिती मार्केटयार्डातील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
फळभाज्यांचे १० किलोचे भाव- कांदा : ६०-९०, बटाटा : १२०-२२०, लसूण : ३५०-८००, आले : ५००-१०००, भेंडी : ३००-४००, गवार : गावरान व सुरती ः ५००-७००, टोमॅटो : ६०-८०, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : १५०-२५०, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : २५०-३००, काकडी : १५०-२००, कारली : हिरवी ः २५०-३००, पांढरी : २००-२५०, पापडी : ३००-३५०, पडवळ : ३००-४००, फ्लॉवर : १००-१६०, कोबी : ६०-१००, वांगी : १००-२००, डिंगरी : २५०-३००, नवलकोल : ६०-८०, ढोबळी मिरची : २००-३००, तोंडली : कळी ः ३००-३५०, जाड : २००-२५०, शेवगा : २५०-३००, गाजर : १००-१५०, वालवर : २५०-३००, बीट : ६०-१००, घेवडा : १०००-१३००, कोहळा : १००-१५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २५०-३००, भुईमूग शेंग : ४५०-५५०, मटार : परराज्य : ६००-७००, पावटा : ४५०-५००, तांबडा भोपळा : १००-१६०, कैरी तोतापुरी ः २५०-३००, कैरी गावरान : २५०-३००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

चुका, चवळईच्या भावात घट
मार्केट यार्ड : येथील बाजारात रविवारी पालेभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेने वाढली असून चुका आणि चवळईच्या भावात घट झाली आहे तर कोथींबीर, मेथी, शेपू, कांदापात, चाकवत, करडई, मुळे, राजगिरा आणि पालकचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
चुक्याच्या भावात घाऊक बाजारात एक रुपया आणि चवळईच्या भावात दोन रुपयांनी घट झाली तर पुदीना आणि अंबाडीच्या भावात प्रत्येकी एक रुपयांनी वाढ झाली आहे. इतर सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेने स्थिर होते. मार्केटयार्डात रविवारी कोथिंबिरीची सव्वालाख जुडींची तर मेथीची ५० हजार जुडींची आवक झाली.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ८००-१६००, मेथी : ८००-१५००, शेपू : ४००-८००, कांदापात : ४००-१०००, चाकवत : ५००-७००, करडई : ३००-६००, पुदीना : ३००-६००, अंबाडी : ३००-७००, मुळे : ६००-१०००, राजगिरा : ३००-७००, चुका : ४००-७००, चवळई : ३००-५००, पालक : ६००-१०००.

डाळिंब, चिक्कू, लिंबाच्या भावात घट
मार्केट यार्ड : येथील फळबाजारात चिक्कू, डाळिंब आणि लिंबाच्या भावात घट झाली असून कलिंगड आणि खरबुजाच्या भावात वाढ झाली आहे तर पपई, अननस, संत्रा, मोसंबी आणि पेरूचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. केरळ येथून अननस सहा ट्रक, संत्री दोन टन, मोसंबी २५ टन, डाळिंब ४० टन, पपई आठ टेम्पो, लिंबांची सुमारे दोन हजार गोणी, कलिंगड १० टेम्पो, खरबूज सहा टेम्पो, पेरू ५०० क्रेट्स, चिक्कू दोन हजार डागांची आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ५००-१०००, मोसंबी : (३ डझन) : २५०-४००, (४ डझन) : १००-२५०, संत्रा : (१० किलो) : ३००-५००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१३०, गणेश : ५-३०, आरक्ता १०-४०, कलिंगड : ८-१४, खरबूज : १५-२२, पपई : ७-१५, अननस (एक डझन) : १००-५००, पेरू (२० किलो) : २५०-४००, चिक्कू (१० किलो) : १००-३००.

फुलांच्या भावात वाढ
मार्केट यार्ड : सद्यःस्थितीत लग्नसराई सुरु असल्याने शोभीवंत फुलांना मागणी वाढली आहे. तुलनेने आवक कमी असल्याने भावात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गुलटेकडी मार्केटयार्डात रविवारी फुलांना मागणी वाढल्याचे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १० ते ५० गुलछडी : ७० ते १२०, अष्टर : जुडी २० ते ३०, सुट्टा ः १०० ते १८०, कापरी : १० ते ४०, शेवंती : १०० ते १२०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-५०, गुलछडी काडी : ३०-१००, डच गुलाब (२० नग) : १०० ते २००, जर्बेरा : ५० ते ८०, कार्नेशियन : १५० ते २००, शेवंती काडी ः १५० ते २५०, लिलियम (१० काड्या) ः १००० ते १२००, आॅर्चिड ः ४०० ते ५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८० ते १२० , जिप्सोफिला : १५० ते ३००, मोगरा : २५० ते ३५०.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com