‘भेदभाव न करता निर्णय घ्यावा’

‘भेदभाव न करता निर्णय घ्यावा’

मार्केट यार्ड, ता. १२ : व्यवसायकरामध्ये महिलांसाठी २५ हजार रुपयांपर्यंत मासिक पगारावर करकपात करावी लागणार नाही, असा राज्य शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, राज्याच्या अर्थसंकल्पात सकारात्मक विचार करून महिला व पुरुष कर्मचारी असा भेदभाव न करता सर्वांसाठीच असा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी दी पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी केला. याबाबतचे निवेदन चेंबरतर्फे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

बाठिया म्हणाले, ‘‘महाराष्ट्र शासनाला ४ फेब्रुवारी २०२३ रोजी व्यवसायकराबाबत निवेदन दिले होते. तसेच वेळोवेळी मंत्र्यांच्या भेटी घेऊन याबाबत पाठपुरावा केला होता. या टॅक्सपेक्षा रिटर्न भरण्याचा खर्च जास्त आहे. महसुलाच्या दृष्टीने विचार करता व्यवसाय करामार्फत फारसा महसूल शासनाला मिळत नाही. त्यामुळे प्रोफेशनल टॅक्स (व्यवसाय कर) रद्द करण्यात यावा किंवा ज्या अस्थापनेमध्ये १०-१२ एवढे कमी कर्मचारी आहेत, अशा छोट्या आस्थापनेला यामधून सूट देऊन सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com