Ajit Pawar
Ajit Pawaresakal

Ajit Pawar : निवडणुकीचा अधिकार काढणे चुकीचे; अजित पवार

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड तोलणार पतसंस्थेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात पवार बोलत होते

मार्केट यार्ड : सर्वसाधारण सभेला उपस्थित न राहणाऱ्या सदस्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेणे, तसेच त्यांना निवडणूक लढविण्यास मनाई करणारा सहकार कायद्यातील बदलाचा शासनाकडून अध्यादेश काढला जात आहे.

सभासदांचा अधिकार काढून घेणे हे कदापि खपवून घेतले जाणार नाही. सभासदांना अधिकारापासून वंचित करणे हा सहकाराचा उद्देश नाही. वेळप्रसंगी यावरून न्यायालयीन लढाई होण्याची शक्यता असल्याचे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले.

Ajit Pawar
Pune Crime : अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार; तिघांविरुध्द गुन्हा दाखल, एकाला अटक

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड तोलणार पतसंस्थेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात पवार बोलत होते. कामगार नेते डॉ. बाबा आढाव, पुणे बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, उपसभापती रवींद्र कंद,

जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, बाजार समितीचे संचालक गणेश घुले, अनिरुद्ध भोसले, संतोष नांगरे, मनीषा हरपळे, नानासाहेब आबनावे, बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर, पतसंस्थेचे अध्यक्ष बबन घुले, संस्थापक हनुमंत बहिरट पाटील, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, तोलणार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरघे, प्रमोद भांडवलकर आदी उपस्थित होते.

Ajit Pawar
Pune Ransom : पैशांसाठी तगादा लावणाऱ्या सावकाराविरुध्द खंडणीचा गुन्हा

तोलणार कामगारांच्या घरांसाठी सरकारी जागा देण्याच्या बहिरट यांनी केलेल्या मागणीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन पवार यांनी यावेळी दिले. पवार म्हणाले, ‘‘सभासदांचा अधिकार काढून घेण्याच्या अध्यादेशावर अद्याप राज्यपालांची स्वाक्षरी झालेली नाही. आम्ही अध्यादेशाची वाट पाहत आहोत. परंतु हा निर्णय चुकीचा आहे. अनेक सभासद हे वैयक्तिक अडचणी आणि काही कारणामुळे सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकत नाहीत. जे अपवाद असतील त्यांना निश्चितच शासन केले पाहिजे. जे चांगले काम करत आहेत, त्यांना प्रोत्साहनही दिले पाहिजे.

Ajit Pawar
Pune Crime : चोरीचे 14 मोबाईल व एक दुचाकी हस्तगत, सात गुन्ह्यांमधील पावणेदोन लाखाचा मुद्देमाल ताब्यात

नवनियुक्त संचालक मंडळाला तंबी
बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाने चुकीचे काम न करता शेतकरी केंद्रबिंदू मानून चांगले काम करावे. निवडणूक झाली की सगळं विसरायचं असतं. सर्वांसाठी समान नियम असावेत, दुजाभाव करू नयेत. आज आम्ही विरोधात असलो तरी आम्हाला विविध आयुधे वापरता येतात, असा इशारा पवार यांनी संचालक मंडळाला दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com