जोधपूरला जाणारी हवाई वाहतूक सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोधपूरला जाणारी हवाई वाहतूक सुरु
जोधपूरला जाणारी हवाई वाहतूक सुरु

जोधपूरला जाणारी हवाई वाहतूक सुरु

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : हवाई वाहतूक पुन्हा सुरु करावी, असे निवेदन पूना मर्चंट्स चेंबरने नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांना दिले होते. चेंबरच्या पाठपुराव्यामुळे पुण्याहून जोधपूरला जाणारी हवाई वाहतूक गेल्या आठवड्यापासून पुन्हा सुरु झाली असल्याची माहिती दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली.
जोधपूर परिसरातील अनेक नागरिक पुण्यामध्ये मोठया प्रमाणात राहत आहेत. पुण्यामधून जोधपूरला तीर्थयात्रेसाठी जाणारा वर्गही जास्त आहे. तसेच, पुण्यातील व्यापाऱ्यांनाही व्यापारानिमित्त जोधपूरला जावे लागते. यापूर्वी पुण्यातून जोधपूरला जाण्यासाठी हवाई वाहतुकीची सुविधा होती. परंतु, काही कारणामुळे ती बंद केली होती. त्या पार्श्वभूमीवर चेंबरने सातत्याने पाठपुरावा केला होता.