अभियांत्रिकीसाठी आजपासून सर्वेक्षण

Today's survey for engineering
Today's survey for engineering

पुणे : अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशात वाढ व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे पावले उचलली जात आहेत. या अंतर्गत शुक्रवार (ता. 14) पासून पंधरा दिवसांचे राज्यव्यापी शैक्षणिक सर्वेक्षण करून त्यातून पुढील पाच वर्षांचा कृती आराखडा तयार केला जाणार आहे.

राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक प्रवेशातील दर वर्षी जवळपास 50 ते 55 टक्के जागा रिक्त राहत असल्याचे दिसून येते. गेल्या काही वर्षांप्रमाणेच यंदाच्या प्रवेशप्रक्रियेतही केवळ 45 टक्के जागांवरच विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. या अभ्यासक्रमातील प्रवेशात होणारी घट मंडळाने गांभीर्याने घेतली आहे. 

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम कालबाह्य झाला आहे का, प्रवेशसंख्या वाढीसाठी काय करता येतील, नवीन पदविका अभ्यासक्रमाची गरज वाटते का, या संदर्भात तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, पालक आणि आजी-माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. मंडळातर्फे पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि मुंबई येथे सर्वेक्षणाशी निगडित विशेष कार्यशाळाही घेण्यात येत आहेत.
 
सर्वेक्षणात हे घेणार जाणून
शालेय विद्यार्थ्यांचा करिअरचा ट्रेंड
दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा कोणत्या क्षेत्राकडे कल
अभियांत्रिकी पदविकेनंतरही पदवी अभ्यासक्रमाची गरज का भासते
केवळ पदविका अभ्यासक्रमानंतर मिळणाऱ्या नोकरीच्या संधी

यंदा राज्यात पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी सुमारे एक लाख २५ हजार जागा होत्या. त्यातील केवळ ४५ टक्के जागांवर प्रवेश झाले. अभ्यासक्रमातील प्रवेशवाढीसाठी केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणातून २०१९-२० ते २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांसाठीचा कृती आराखडा तयार केला जाईल.
- डॉ. विनोद मोहितकर, संचालक, राज्य तंत्र शिक्षण मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com