अवयवदानाविषयी आज उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

पुणे - अंधश्रद्धा आणि गैरसमजुतींमुळे जगाच्या तुलनेत भारतात अवयवदानाची संकल्पना फारशी रुजलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर ‘रोटरी क्‍लब ३१३१’ने सुरू केलेल्या अवयवदान जागृती उपक्रमांतर्गत शंभरहून अधिक प्रशिक्षित स्वयंसेवक शिक्षण संस्था, कंपन्या, बॅंकांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. याच उपक्रमांतर्गत गुरुवारी (ता. ९) सकाळ ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अवयवदानाचे अधिकाधिक फॉर्म ऑनलाइन भरून गिनेस बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदण्याचा प्रयत्न ‘सकाळ’च्या सहकार्याने केला जाणार आहे.

सह्याद्री हॉस्पिटलच्या सर्व केंद्रांमध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत; तसेच म्हात्रे पूल परिसरातील डीपी रस्त्यावरील घरकुल लॉन्स येथे दुपारी ३ वाजल्यापासून फॉर्म भरता येईल. त्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट अथवा अन्य कोणतेही मान्यताप्राप्त फोटो आयडी जवळ असणे आवश्‍यक आहे. घरकुल लॉन्स येथेच सायंकाळी ५ वाजता अभिनेते पुष्कर श्रोत्री यांच्या ‘हसवा फसवी’ या विनोदी नाटकाचा विनामूल्य प्रयोग ऑर्गन डोनर्ससाठी होणार आहे. हॉटेल श्रेयस आणि रसिक साहित्य कार्यक्रमाचे स्थळ प्रायोजक 
आहेत. या उपक्रमात नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे विठ्ठल काटे व मकरंद टिल्लू यांचा मोलाचा सहभाग आहे.

संकेतस्थळावरही करा नोंदणी
रोटरी क्‍लबच्या गिफ्ट लाइफ या उपक्रमाविषयी माहिती घेण्यासाठी www.giftlife.co.in  या संकेतस्थळाला भेट द्या. प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित न राहू शकणाऱ्यांना ‘गिफ्ट लाइफ’च्या संकेतस्थळावर अवयवदान नोंदणी प्रक्रिया करता येईल. तसेच या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन या लिंकवर मागितलेली माहिती भरा. फोटो आयडी अपलोड करून सबमिट करा आणि डोनर कार्ड डाउनलोड करून घ्या.

Web Title: Todays undertaking about organism