दोन कोटींचे स्वच्छतागृह पडले बंद 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

पुणे : सिंहगड रस्त्यावर तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून उभारलेले स्वच्छतागृह बंद पडले आहे. तेथे आवश्‍यक सुविधा नसल्याने ते वापरणे गैरसोयीचे ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

राजाराम पुलानजीक सांडपाणी शुद्धीकरण केंद्राजवळ महिलांसाठी ई टॉयलेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या विकास निधीतून हे काम करण्यात आले. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात याचे काम पूर्ण झाले. एक वर्ष पूर्ण होण्याच्या आताच हे स्वच्छतागृह वापरण्यास बंद झाले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या नावाखाली पैशाची होणारी उधळपट्टी अतिशय दुर्दैवी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. 

स्वच्छतागृहात पैशाची सुटी नाणी टाकून वापर करता येत होता; परंतु आता ही यंत्रणाच बिघडल्याचे निदर्शनास येत आहे. या स्वच्छतागृहात असणारे स्वयंचलित पंखे आणि दिवे, पाणी सध्या बंद आहे. स्वच्छतागृह सुरू झाल्यापासून किती महिलांनी याचा वापर केला हा संशोधनाचा विषय आहे. स्वच्छतागृहासमोरील पत्र्यावर जाहिरातींचे कागद चिटकवले आहेत, त्यामुळे ते ओळखून येत नाही. या स्वच्छतागृहाच्या देखभालीचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे, ती कंपनी कोणती आणि स्वच्छता केव्हा करते, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: toilets fell off which was made of Two crores rupees