‘तोलाईप्रश्‍नी राज्यव्यापी संप करू’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

तोलाईप्रश्‍नी दोन दिवसांत सरकारने निर्णय घेतला नाही, तर राज्यातील हमाल आणि तोलणार संपावर जातील, असा इशारा ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी दिला.

मार्केट यार्ड - तोलाईप्रश्‍नी दोन दिवसांत सरकारने निर्णय घेतला नाही, तर राज्यातील हमाल आणि तोलणार संपावर जातील, असा इशारा ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी दिला.

महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने डॉ. आढाव यांच्या नेतृत्वाखाली हमाल भवन येथून शारदा गजानन मंदिर येथे बुधवारी मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर आयोजित बैठकीला राजेंद्र चोरघे, दादा तुपे, विलास थोपटे, चंद्रकांत मानकर, अंकुश हारपुडे, किशोर भानुसघरे, राजेश मोहोळ, हनुमंत बहिरट, नवनाथ बिनवडे, गोरख मेंगडे, पौर्णिमा चिखलमाने यांची भाषणे झाली. या वेळी कामगार-तोलणार-टेंपोचालक मालक उपस्थित होते.

दरम्यान, भुसारमधील व्यापाऱ्यांनी मालाच्या गाड्या खाली करण्यासाठी बाहेरून हमाल मागविले. त्यावरून हमाल, तोलणार आणि व्यापारी यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्ती करून वाद मिटविला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tolai Issue Strike Dr Baba Adhav