Pune News: 24 तासात टोलवर पुर्ववतपणे स्थानिकांना माफी न दिल्यास राष्ट्रवादी चे आंदोलन ; सुप्रिया सुळे
नसरापूर - खेड शिवापूर टोल नाक्यावर स्थानिकांना बंद केलेली टोलमाफी येत्या 24 तासात पुर्ववतपणे चालु न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलनासाठी रस्त्यावर उतरेल असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
खा. सुळे भोर तालुक्यातील महामार्ग पट्ट्यातील वरवे व शिवरे या गावी विविध विकास कामांचे उदघाटन व शिवरे गावातील रस्त्याच्या प्रश्नावरील बैठकीस उपस्थित होत्या,
यावेळी उपस्थित पत्रकारांनी टोल नाक्यावर अरेरावी ने स्थानिकांनकडुन वसुल होत असलेल्या वसुली बाबत प्रश्न विचारला असता खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या की या बाबत मला माहीत मिळाली आहे.
टोल प्रशासन व महामार्ग प्राधिकरणाने मागील आंदोलनात दिलेला शब्द फिरवत आहे हे योग्य नाही दिल्ली पातळीवर जो निर्णय व्हायचा आहे.तो अद्याप प्रलंबित आहे मध्येच चालु केलेली टोल येत्या 24 तासात बंद न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलनासाठी रस्त्यावर उतरेल. असा इशारा त्यांनी टोल प्रशासनाला दिला आहे.
टोल नाक्यावर हटाव संघर्ष समिती चे निमंत्रक ज्ञानेश्वर दारवटकर यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेचे स्वागत केले असूनसुप्रिया ताई आमच्या आंदोलनाच्या प्रमुख मार्गदर्शक आहेत.
त्यांनी घेतलेल्या भुमिके बद्दल आम्हाला आनंद आहे त्यांच्या इशारयाने प्रशासनास निश्चित जाग येईल आंदोलनाची वेळ आल्यास आम्ही त्यांच्या बरोबर आहोत.
तो अद्याप प्रलंबित आहे मध्येच चालु केलेली टोल येत्या 24 तासात बंद न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलनासाठी रस्त्यावर उतरेल. असा इशारा त्यांनी टोल प्रशासनाला दिला आहे.