टोमॅटो, वांगी, गवार कडाडले

मार्केटयार्ड - पावसामुळे  मार्केटयार्डमधील भाज्यांचे भाव कडाडले.
मार्केटयार्ड - पावसामुळे मार्केटयार्डमधील भाज्यांचे भाव कडाडले.

मार्केट यार्ड - गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि जिल्ह्यात होणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका फळभाज्यांना बसल्याने टोमॅटो, मटार, वांगी, गवार यांचे भाव गगनाला भिडले आहेत. किरकोळ बाजारात प्रतिकिलो ८० रुपये भाव झाल्याची माहिती विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी दिली.

गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे टोमॅटो, वांगी, गवार यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामुळे बाजारात येणारा माल हा खराब येत आहे. टोमॅटो वरून चांगले दिसत असले, तरी त्यामध्ये पाणी निघत आहे; तसेच वातावरण पोषक नसल्याने टोमॅटोला कलर येत नाही. वांगी आणि गवार हा मालसुद्धा खराब येत असल्याने क्रेटमध्ये २-३ तीन किलो माल खराब येत आहे. ग्राहक दर्जेदार फळभाज्यांची मागणी करीत आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव वाढत असल्याचे ढमढेरे यांनी सांगितले.

घाऊक बाजारात दर्जानुसार टोमॅटोला प्रतिदहा किलोला २००-३०० रुपये; तसेच गवार ३००-५०० रुपये, वांगी २००-३५० रुपये भाव मिळत असल्याची माहिती मार्केट यार्ड अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली. रविवारी मार्केट यार्डातील बाजारात टोमॅटो ५००० पेट्या, गवार आणि वांगी यांची ५ टेम्पो आवक झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com