संख्याबळाचा आढावा घेऊन आघाडीबाबत उद्या बैठक? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीत आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमधील चर्चेची बैठक मंगळवारी होणार आहे. तत्पूर्वी दोन्ही पक्ष संख्याबळाच्या दाव्यांचा फेरआढावा घेणार आहेत. 

आघाडीबाबत शनिवारी रात्री झालेल्या बैठकीतूनही ठोस निष्कर्ष निघाला नाही. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सोमवारी (ता.23) बैठक होणार आहे. त्यात पक्षनेते अजित पवार संवाद साधणार आहेत. यात राष्ट्रवादीने केलेला दावा आणि कॉंग्रेसची मागणी, याबाबत चर्चा होणार आहे; तसेच प्रभागनिहाय परिस्थितीबद्दलही विचारविनिमय होईल. 

कॉंग्रेसही प्रभागनिहाय आराखडे, महापालिकेत सत्तेवर आल्यावर मिळणारी अधिकाराची पदे, याबद्दल पक्षांतर्गत नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक सोमवारी होणार असल्याने आघाडीची पुढील बैठक मंगळवारी होण्याची शक्‍यता आहे, असे राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा आणि खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितले. राष्ट्रवादीने 116-46; तर कॉंग्रेसने 91-71 या संख्याबळानुसार आघाडी व्हावी, असे सूत्र मांडले आहे. 

Web Title: tomorrow congress & NCP meeting