#mynewspapervendor उद्या 'वृत्तपत्र विक्रेता दिन'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

वर्षानुवर्षे आपल्या घरी वृत्तपत्र पोचवणाऱ्या विक्रेत्यासोबत तुम्हीही घ्या एक सेल्फी आणि सलाम करा. थंडी, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता कार्यरत राहणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांना! हा सेल्फी #mynewspapervendor या हॅशटॅगसह पाठवा 9922419150 या व्हॉट्‌सऍप क्रमांकावर किंवा wededitor@esakal.com या ई-मेलवर. या सेल्फीला ई-सकाळवर प्रसिद्धी दिली जाईल आणि आपल्या वृत्तपत्र विक्रेत्याबरोबर आपले नातेही अधिक दृढ होईल.

पुणे : भारताच्या दक्षिण टोकावरील एका छोट्या खेड्यातला छोटा वृत्तपत्र विक्रेता ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती असा विस्मयकारक प्रवास करणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी वयाच्या आठव्या वर्षी कलाम त्यांच्या चुलतभावाबरोबर वृत्तपत्र वितरणाचे काम करीत असत. ''वृत्तपत्र वितरणाच्या कामातून झालेल्या आपल्या पहिल्यावहिल्या कमाईने जागृत केलेली आत्मसन्मानाची भावना आज पन्नास वर्षांनंतरही आपल्याला जाणवत राहते'', असा उल्लेख डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी 'विंग्ज ऑफ फायर' या त्यांच्या आत्मचरित्रात केला आहे.

डॉ. कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्‍टोबर, या वर्षीपासून 'वृत्तपत्र विक्रेता दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोचवण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी याच दिवसाचे औचित्य साधून सकाळ माध्यम समुहाने सुरू केलाय 'वृत्तपत्र विक्रेता दिन' सुरू केला आहे.

यासाठी वर्षानुवर्षे आपल्या घरी वृत्तपत्र पोचवणाऱ्या विक्रेत्यासोबत तुम्हीही घ्या एक सेल्फी आणि सलाम करा. थंडी, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता कार्यरत राहणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांना! हा सेल्फी #mynewspapervendor या हॅशटॅगसह पाठवा 9922419150 या व्हॉट्‌सऍप क्रमांकावर किंवा wededitor@esakal.com या ई-मेलवर. या सेल्फीला ई-सकाळवर प्रसिद्धी दिली जाईल आणि आपल्या वृत्तपत्र विक्रेत्याबरोबर आपले नातेही अधिक दृढ होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tomorrow Newspaper Sellers Day