एलईडी बल्ब खरेदीत पुणे अव्वल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

पुणे - सामान्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणारे आणि नेहमीच्या बल्बपेक्षाही पाच पट ऊर्जेची क्षमता असलेल्या एलईडी बल्ब खरेदीत पुणे जिल्हा राज्यात अग्रेसर ठरले आहे. ३१ मार्च २०१७ पर्यंत तब्बल २८, १०,७७५, तर ग्रामीण भागात ४,२१,१७७ एलईडी बल्बची खरेदी झाली आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्‍यांपैकी बारामती तालुक्‍यात ४, ८९, ६४४ बल्ब नागरिकांनी खरेदी केले असल्याची नोंद केंद्र सरकारच्या एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिस लिमिटेड (ईईएसएल) या कंपनी केली आहे.

खासगी कंपन्यांच्या तुलनेत ग्राहकांना माफक दरात वीज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारने एलईडी बल्बची योजना आणली. पुणे जिल्ह्यात चार डिसेंबर २०१५ रोजी ही योजना सुरू झाली. सुरवातीला सात वॉट बल्बची किंमत शंभर रुपये होती, आता ती ८५ रुपये आहेत. नऊ वॉटच्या बल्बची किंमत ६५ रुपये आहे. 

पुणे जिल्ह्याखालोखाल कोल्हापूर जिल्ह्यात १२,५३,०२६ बल्ब, सिंधुदुर्ग ३,७१,००४, सातारा ३,५३,४०४ च सांगली जिल्ह्यात १,३९,८५५ बल्ब विकले गेल्याची नोंद ‘ईईएसएल’ने केली आहे. ‘ईईएसएल’चे प्रादेशिक संचालक दीपक कोकाटे म्हणाले, ‘‘विजेची बचत झाल्यास उद्योगधंद्यांना देखील स्वस्तदरात वीज उपलब्ध करून देता येते.’’ 

Web Title: The top shopping in Pune LED bulb