जुन्नरमध्ये कोरोनामुळे आणखी एक रुग्णाचा मृत्यू; मृतांची संख्या...

Corona Virus
Corona Virus

जुन्नर : आर्वी-पिंपळगाव ता.जुन्नर येथील कोरोनाबाधिताचा उपचार सुरू असताना पुण्यात शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला, अशी माहिती सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी एम.बी. भोर यांनी दिली. यामुळे तालुक्यातील मृतांची संख्या तीन झाली आहे. एकूण ८३ रुग्णांपैकी ४५ बरे झाले असून, ३५ जण उपचार घेत आहेत.

शेजारच्या तालुक्यात कामास असलेल्या पुतण्याचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या पत्नी व दोन मुले तसेच मृत्यू झालेले काका यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. पत्नी व दोन मुलांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. काकांना त्रास होऊ लागल्याने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्रास वाढल्याने त्यांना औंध येथे पाठविण्यात आले असता तेथे त्यांना मृत्यू आला. त्यांच्या मृत्यूनंतर स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यांच्या घरातील पाच जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून, त्यांचे स्वब तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्रलंबित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com