अनधिकृत बांधकामांबाबतची तब्बल 40 कोटींची यंत्रणा बंद 

अनधिकृत बांधकामांबाबतची तब्बल 40 कोटींची यंत्रणा बंद 

पुणे - अनधिकृत बांधकामांना प्रतिबंध व्हावा आणि झालेल्या बांधकामांची माहिती मिळावी, म्हणून 40 कोटी रुपये खर्च करून तयार केलेले मोबाईल ऍपवर आधारित यंत्रणा तांत्रिक कारणामुळे बंद आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला "माहिती अधिकारा'त ही माहिती मिळाली आहे. 

तत्कालीन आयुक्त महेश झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएमआरडीएने 2015 मध्ये एका संस्थेमार्फत गुगल कनेक्‍टेड मोबाईल ऍप आणि यंत्रणा तयार करून घेतली. त्यामुळे नागरिकांना अनधिकृत बांधकामांची तक्रार फोटो काढून गुगलद्वारे संबंधित ऍपच्या माध्यमातून करता येत होती. त्यानुसार काहीकाळ या ऍपचा वापरही झाला; परंतु झगडे यांची बदली झाल्यापासून हे ऍप बंद आहे. 

याबाबत मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ता हेमंत संभूस, प्रवक्ते संजय शिरोडकर, सचिव योगेश खैरे, संतोष पाटील यांनी आयुक्त किरण गित्ते यांच्याकडे विचारणा केली असता, तांत्रिक कारणामुळे ऍप बंद असल्याचे त्यांनी सांगितले. त्या ऍपवर किती तक्रारी आल्या, किती फोटो आले, कारवाई किती झाली आदींचे तपशील माहिती अधिकारात विचारले असता, संबंधित फाइल उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्याचे संभूस यांनी सांगितले. 40 कोटी रुपये खर्च करून तयार केलेले ऍप बंद ठेवण्याचे कारण काय, असा प्रश्‍न मनसेने विचारले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या दुर्लक्षामुळेच पीएमआरडीएचा कारभार खालावल्याचा आरोप संभूस यांनी केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com