Corona Update : पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या २१९

कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला दोन वर्षे पूर्ण झाली
active corona patients Pune district is 219
active corona patients Pune district is 219 Sakal

पुणे : कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला गुरुवारी (ता.२४) दोन वर्षे पूर्ण झाली. योगायोगाने लॉकडाऊन सुरु झालेल्या घटनेस दोन वर्षे पूर्ण होण्याच्या दिवशीच पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही १० एप्रिल २०२० पेक्षाही कमी झाली आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही २१९ इतकी झाली आहे. १० एप्रिल २०२० ला जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या २४७ इतकी होती, असे आरोग्य विभागातून सांगण्यात आले.

देशात २४ मार्च २०२० पासून लॉकडाऊनला सुरवात झाली होती. त्या घटनेस गुरुवारी बरोबर दोन वर्षे पूर्ण झाली. योगायोगाने याच दिवशी पुणे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून पहिल्या २१ दिवसांत सापडलेल्या एकूण कोरोना रुग्णांएवढीच झाली असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने गुरुवारी (ता.२४) प्रसिद्ध केलेल्या कोरोना रुग्ण अहवालातून स्पष्ट झाले आहे.

गुरुवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यात फक्त ३४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील दिवसांतील एकूण रुग्णांत पुणे शहरातील अवघे १४ नवे रुग्ण आहेत. दिवसात पिंपरी चिंचवडमध्ये १२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात तीन आणि नगरपालिका हद्दीत पाच नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात एकही नवीन कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नसल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले.

पुणे शहरात सध्या केवळ एकूण १०८ सक्रिय कोरोना रुग्ण शिल्लक राहिले आहेत. यापैकी सहा रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार करण्यात येत आहेत. उर्वरित १०६ जण गृह विलगीकरणात आहेत. सद्यःस्थितीत पिंपरी चिंचवडमध्ये ७३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १८, नगरपालिका हद्दीत सात आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १३ सक्रिय कोरोना रुग्ण शिल्लक राहिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com