शनिवारवाड्यावर पर्यटकांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 डिसेंबर 2018

बाजीराव-मस्तानी चित्रपटानंतर शनिवारवाडा पाहण्याची खूप इच्छा होती. दोन वर्षांनंतर ही इच्छा पूर्ण होत आहे. या वाड्याची भव्यता येथे आल्यावर समजली. 

- सागर धुमाळ, औसा, जि. लातूर 

पुणे : नाताळ सणामुळे शाळांना लागलेल्या सलग सुट्या, वर्षाच्या शेवटच्या रजा आणि पुण्याबाहेरील शाळांच्या सहलीचे आकर्षण असलेल्या शनिवारवाड्यावर पर्यटकांची गर्दी झाल्याचे चित्र शनिवारी दिसत होते. त्यामुळे शनिवारवाड्याचा दिल्ली दरवाजाही उघडण्यात आला होता. 

नाताळच्या सुट्या लागल्यापासून पर्यटकांची गर्दी वाढली आहे. यात शाळांच्या सहली; तसेच परगावाहून सुटीसाठी पुण्यात आलेल्या नागरिकांचे मोठे प्रमाण आहे, असे निरीक्षण येथील कर्मचाऱ्यांनी नोंदविले. 

शनिवारवाडा हा परदेशी पर्यटकांचेही आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून येथे येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या वाढली असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

अशी वाढले पर्यटक (कंसात परदेशी पर्यटक) 

29 डिसेंबर ....... 5758 (45) 
28 डिसेंबर ....... 4522 (51) 
27 डिसेंबर ......... 4602 (35) 
26 डिसेंबर ........ 4724 (25) 

Web Title: Tourist Came at Shanivarwada with Crowd