पावसाअभावी भुशी धरणावर पर्यटकांचा हिरमोड 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

लोणावळा परिसरात सध्या वर्षाविहार व निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, पावसाने दडी मारली असून, भुशी धरण्याच्या पायऱ्यांवरील पाणी ओसरल्याने वीकेंडला वर्षाविहारासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला. 
 

लोणावळा : लोणावळा परिसरात सध्या वर्षाविहार व निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, पावसाने दडी मारली असून, भुशी धरण्याच्या पायऱ्यांवरील पाणी ओसरल्याने वीकेंडला वर्षाविहारासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला. 

पावसाळ्यात पर्यटकांची लोणावळ्यामध्ये मोठी गर्दी असते. लोणावळा, खंडाळा, कार्ला, भाजे ही ठिकाणे सध्या पावसाळी पर्यटनाचे केंद्र म्हणून प्रसिद्ध होत आहेत. विशेषतः लायन्स पॉइंट, भुशी धरण परिसरात पर्यटकांची पसंती असते. नुकत्याच झालेल्या दमदार पावसाने भुशी धरणाच्या सांडव्यावर भिजण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, पावसाने गेल्या चार दिवसांपासून ओढ दिल्याने सांडव्यावरून वाहणारे पाणी ओसरले.

शनिवारी (ता. 20) पाऊस नसूनही पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, त्यांचा हिरमोड झाला. दुपारी पावसाच्या काही सरी कोसळल्याने पर्यटकांनी थोडा का होईना वर्षाविहाराचा आनंद लुटला, तर दुसरीकडे भाजे, लोहगड या ठिकाणीही पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, पाऊस नसल्याने पर्यटकांना माघारी फिरावे लागले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tourist disappointed in lonavla due to rain