पर्यटकांनाे माळशेज घाटात जरा जपून

Malshej-Ghat
Malshej-Ghat

पुणे - पुणे, नगर, ठाणे या तीन जिल्ह्यांतील सीमारेषेवर असणारा माळशेज घाट व परिसर निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. पावसाळ्यात वर्षाविहारासाठी पर्यटकांची सर्वांत जास्त पसंती या घाटालाच असते. परंतु, घाटात धोकादेखील तेवढाच आहे. त्यामुळे पर्यटकांनी जरा जपूनच पर्यटन करावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. 

सह्याद्रीच्या कुशीतील माळशेज घाट हे पावसाळ्यात पर्यटकांसाठी मौजमजेचे आणि मनमुराद आनंद लुटण्याचे केंद्र आहे. घाटाचे सौंदर्य सर्वांना मोहवून टाकणारे आहे. उंच पर्वतरांगांतून निघालेल्या चिंचोळ्या वाटांतून खळाळत कोसळणारे धबधबे, लांबच-लांब पसरलेला दऱ्यांमधील प्रदेश आणि चोहोबाजूंनी पसरलेल्या हिरव्यागार रांगांमध्ये पसरलेली टेबल लॅंड; त्यामुळे माळशेज घाटात वर्षाविहारासाठी देश-विदेशातून पर्यटक येतात. 

शनिवारी (ता. २९) दुपारी माळशेज पट्ट्यातील वेळ खिंडीत दरड कोसळून दगड व मातीचा राडारोडा नगर-कल्याण महामार्गावर आला होता. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. तसेच, वाहतूक जास्त प्रमाणात प्रभावित झाली नाही. दरम्यान, काही वर्षांपासून माळशेज घाट हा पडणाऱ्या दरडी, रस्ता खचणे, डोंगराचे कडेच्या कडे तुटून रस्त्यावर पडून वाहतूक ठप्प होऊन जीवितहानी होणे, या सर्व कारणांनी जास्तच चर्चेला आला आहे. 

प्रशासनाने माळशेज घाटात धोकादायक ठिकाणी लोखंडी जाळी लावणे, सिमेंट काँक्रिटीकरण करून धोकादायक कठडे तसेच नाले मजबुतीकरण करणे, लोखंडी रेलिंग लावणे हे व विविध प्रकारचे उपाय केले आहेत. मात्र, ते तोकडे पडून दरवर्षी माळशेज घाटात दरडी पडणे व अपघात होण्याचे सत्र सुरूच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com