घाटघर ग्रामस्थांकडून पर्यटकांच्या नाणेघाटातील वर्षा पर्यटनाला पायबंद

दत्ता म्हसकर
बुधवार, 1 जुलै 2020

जुन्नर तालुक्यातील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे ऐतिहासिक नाणेघाट व किल्ले जीवधन वर्षा पर्यटनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे ऐतिहासिक नाणेघाट व किल्ले जीवधन वर्षा पर्यटनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घाटघर ता.जुन्नर येथील ग्रामपंचायत व संयुक्त वनव्यवस्थापन समिती यांनी घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वन विभागाच्या वतीने वनक्षेत्रातील पर्यटनास बंदी घातलेली असताना देखील गेल्या काही दिवसात येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याचे पाहावयास मिळत होते. मोठ्या संख्येने येणारी वाहने व कोरोनाबाधित क्षेत्रातून येणारे पर्यटक यामुळे गावची चिंता वाढली होती. वनविभाग तसेच पोलिस यंत्रणेने बंदीचा निर्णय झाल्यानंतर पर्यटकांना थांबविण्यासाठी फारशी उत्सुकता दाखविली नाही, असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. यामुळे गावची सुरक्षितता महत्वाची मानून हा निर्णय घेण्यात आला याबाबतचे पत्र सरपंच व ग्रामसेवक यांच्या सहीने वनविभाग, जुन्नर पोलिस यांना देण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नाणेघाटाकडे जाणारा मार्ग बंद केला असून, येथे देखरेख करण्यासाठी गावातील तरुणांची नेमणूक केली आहे.  
जर आपण नाणेघाट किंवा किल्ले जीवधन तेथे जात असाल तर तुमचे जाणे नक्कीच टाळावे अन्यथा याबाबत आपल्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात, असे आवाहन ग्रामस्थांनी केले. पर्यटकांनी कृपया आपण घरीच थांबा व स्वत:ची व आपल्या परिवाराची काळजी घ्या, अशी विनंती करण्यात आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जुन्नरचे वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांनी सांगितले की, पर्यटकांना वनक्षेत्रातील पर्यटनास बंदी घातली आहे. तरीदेखील नाणेघाट येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर जुन्नर पोलिसांकडे आपटाळे व घाटघर येथे नाकाबंदीसाठी पत्रव्यवहार केला आहे. पोलिस बंदोबस्त मिळताच वनविभाग व पोलिस संयुक्तरित्या ही मोहीम राबविणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourists from Ghatghar village stop the tourism in Naneghat Pune