गड सर करायचा, की सिंहगड रस्ता?

अनिल सावळे, सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 January 2021

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या या रस्त्याची नेमकी स्थिती कशी आहे? रखडलेल्या कामामुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांचे होणारे हाल याबाबत मागोवा घेणारी वृत्तमालिका...

खडकवासला, सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे; परंतु तेथे जाण्यापूर्वी सिंहगड रस्त्याची दुरवस्था, वाहतूक कोंडी अशा बाबी डोळ्यासमोर येऊ लागतात. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या या रस्त्याची नेमकी स्थिती कशी आहे? रखडलेल्या कामामुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांचे होणारे हाल याबाबत मागोवा घेणारी वृत्तमालिका...

पुणे - सुटीच्या दिवशी सिंहगडावर जाऊ... ऐतिहासिक स्थळाचं दर्शन... तिथली कांदाभजी अन्‌ मटक्‍यातलं दही...असं बऱ्याच जणांचं प्लॅनिंग असतं... परंतु आता हा गड सर करायचा की त्यापूर्वी सिंहगड रस्त्याची धूळधाण सहन करायची, असा प्रश्‍न विचारला जात आहे. 

नांदेड गावातून पुढे कुठे काम सुरू, तर कुठे पूर्ण रस्ताच खड्ड्यात गेला आहे. हा मनस्ताप सहन करतच सह्याद्रीच्या कुशीतील किल्ल्याचे ऐश्‍वर्य अनुभवायची वेळ पुणेकरांवर आली आहे.

अकरावीला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनो, दुसऱ्या संवर्गातील ऍडमिशनसाठी उद्यापर्यंत मुदत​

सिंहगडाचा पायथा गाठता गाठता माणूस बेजार होतो. कुठे वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागतं. या उद्‌ध्वस्त रस्त्याचा मागोवा घेण्यासाठी आम्ही मोटारीने सिंहगडच्या दिशेने निघालो. दांडेकर पुलापासून धायरीतील रमेश वांजळे उड्डाणपूल. नांदेड सिटीपर्यंतचे अंतर साधारण साडेसात किलोमीटरचे अंतर काही मिनिटांत कापले. पुढे गेल्यानंतर डांबरी रस्ता लागतो. नांदेड गावाच्या हद्दीत डावीकडे नरवीर तानाजी मालुसरे मार्ग लिहिलेला बोर्ड आहे. तेथून पुढे जाताना वाहनचालकांची खरी कसरत सुरू होते...

अति झालं! पुण्यात पोलिसालाच दिली नोकरी घालविण्याची धमकी​

साधारणपणे अकरा किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर खडकवासला गावात अरुंद रस्ता आहे. खडकवासला चौपाटीवर रस्त्याच्या डाव्या बाजूला पार्क केलेली वाहने, दुसऱ्या बाजूला चौपाटी आहे. ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी’जवळ डांबरी रस्ता खड्ड्यात गेला आहे. केंद्रीय विद्यालयाच्या पुढे सिमेंट काँक्रिटचा रस्ता चांगला आहे. एवढा काही मीटरचा पॅच सोडला, तर पुन्हा ‘सावधान’ व्हावे लागते. तेथे रस्त्यावरील छोट्या पुलाचे काम सुरू आहे. पुन्हा वाहनांची गती मंद होत जाते. 

‘पीएम केअर फंडा’चा हवाय हिशोब; माजी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना विचारले प्रश्न​

गरज वेग वाढविण्याची
गोऱ्हे बुद्रूक गावात डाव्या बाजूचे रस्त्याचे काम सुरू आहे. उजव्या बाजूचा रस्ता बराच खराब झाला आहे. सिंहगड दहा किलोमीटर अंतरावर असताना डोणजे गावात कमानीजवळ रस्ता प्रचंड खराब झाला आहे. सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत पोचताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पायथ्यापासून सिंहगड किल्ल्यावर जाताना रस्ता मात्र चांगला झाला आहे. दरड कोसळू नये म्हणून संरक्षक जाळ्याही लावल्या आहेत. सिंहगड ते खेड शिवापूरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे कामही चांगले झाले आहे. गरज आहे ती नांदेड सिटी ते सिंहगड पायथ्यापर्यंत सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांच्या कामाचा वेग वाढविण्याची आणि अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण करण्याची.

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

नागरिक त्रस्त
जाधवनगरमध्ये डाव्या बाजूचे सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे डाव्या बाजूची वाहतूक बंद आहे. उजवीकडील रस्त्यावर मोठे खड्डे आणि धूळ. त्यामुळे वाहनचालकच नव्हे; तर गावातील नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त आहेत. तुम्ही नऊ किलोमीटरपर्यंत गेलात की किरकटवाडी गाव येते. तेथे डांबरी रस्ता बऱ्यापैकी आहे; परंतु अरुंद रस्त्यामुळे वाहनांची गती कमी होते. काही अंतरावर लगेच खड्डे. पुन्हा मध्येच कोठेतरी सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम सुरू. हे पाहताना सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी नेमके रस्ता करताहेत की काय, असा प्रश्‍न पडतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourists visiting Khadakwasla Sinhagad fort