आर्थिक-सामाजिक बदलांच्या दिशेने...

आर्थिक-सामाजिक बदलांच्या दिशेने...

- अभिजित पवार, संस्थापक, अध्यक्ष डीसीएफ ॲडव्हायझरी सर्व्हिसेस्‌, व्यवस्थापकीय संचालक ‘सकाळ माध्यम समूह’

अभिजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या डीसीएफ ॲडव्हायझरी सर्व्हिसेस्‌ने अल्पावधीतच भारतातली आजमितीची महत्त्वाची आणि विस्तारणारी सल्लागार संस्था म्हणून लौकिक मिळवला आहे. अपेक्षित परिणाम साधणारे नियोजन आणि आर्थिक- सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी शासनाला विविध पातळ्यांवर मदत करण्याची क्षमता यातून डीसीएफ ॲडव्हायझरी सर्व्हिसेस्‌ने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. गावे, शहरे, राज्य आणि देशपातळीवरही शासकीय यंत्रणांना विविध क्षेत्रांत आर्थिक- सामाजिक बदलांच्या दिशेने जाणारी धोरणे आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या नियोजनाबाबत डीसीएफ ॲडव्हायझरी सर्व्हिसेस्‌ सर्व आवश्‍यक मदत देऊ शकते.

माध्यमे
अभिजित पवार हे महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालकही आहेत. ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘दैनिक सकाळ’ देशातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये गणला जातो. पवार यांनी २००५ मध्ये ‘ॲग्रोवन’ हे शेतीला वाहिलेले भारतातील पहिले कृषी दैनिक सुरू केले. या दैनिकाद्वारे शेतकऱ्यांना सक्षम करत महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राचा विकास घडवून आणणारी चळवळ सुरू झाली. शेतकऱ्यांना आवश्‍यक असणारी सर्वप्रकारची माहिती आणि त्या अनुषंगाने त्यांच्या शिक्षणाच्या गरजांकडे ॲग्रोवन विशेषकरून लक्ष देते.

फंडिंग
व्हायटल कॅपिटल या जगातल्या सर्वांत मोठ्या गुंतवणूक निधीबरोबर भागीदारी करून अभिजित पवार यांनी स्मार्ट व्हिलेज प्रकल्पासाठी भारतात एक इम्पॅक्‍ट इन्व्हेस्टमेंट फंड सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. इस्रायली कंपन्यांच्या मदतीने महाराष्ट्रातील काही निवडक गावांमध्ये हा प्रकल्प राबवला जाणार आहे. शेतीला प्रतिष्ठा देत शेतकऱ्यांना आधुनिक जगाशी जोडून समृद्धीच्या मार्गावर नेणारा हा आगळावेगळा प्रकल्प आहे.

शैक्षणिक
पठडीतील शिक्षणपद्धतीचा अवलंब न करता कौशल्यांवर आधारित रोजगारक्षम प्रशिक्षण देण्यासाठी पवार यांनी सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटरची (एसआयएलसी) स्थापना केली. एसआयएलसीतर्फे सध्या कृषी, माहिती-तंत्रज्ञान, उद्योजकता, प्रशासन आणि अन्य काही विषयांचे अल्प तसेच दीर्घ मुदतीचे अभ्यासक्रम आयोजित होत असतात.

डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन 
प्रशासन आणि अन्य समाजघटकांच्या मदतीने समाजात बदल घडवून आणण्यासाठी अभिजित पवार यांनी डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनची स्थापना केली. भावनिक नातेबंध, सखोल नियोजन आणि संपूर्ण अंमलबजावणी या तीन सूत्रांच्या साहाय्याने बोर्डरूममधील नियोजन प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने प्रयत्न करणे, हे या फाउंडेशनचे वेगळेपण आहे.

यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क   
‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या (वायआयएन) माध्यमातून अभिजित पवार यांनी १८ ते २४ या वयोगटातील तरुणांसाठी एक व्यासपीठ निर्माण केले. तरुणांनी विविध प्रकल्पांच्या माध्यमातून एकमेकांशी जोडून घ्यावे आणि ‘यिन’च्या मदतीने धोरणनिर्मितीशीही जोडले जावे, हा या व्यासपीठाचा हेतू आहे. युवकांचे प्रति मंत्रिमंडळ (शॅडो कॅबिनेट) निर्माण करणारे ‘यिन’ हे युवकांचे पहिले व्यासपीठ आहे. राज्य सरकारशी जोडून घेत ‘यिन’चे सदस्य प्रत्यक्षात जाणवणाऱ्या विविध मुद्द्यांवर काम करीत आहेत. सध्या ‘यिन’चे १६ लाख सदस्य आहेत.

तनिष्का व्यासपीठ
महिलांची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी, तसेच महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवर काम करण्यासाठी अभिजित पवार यांनी तनिष्का व्यासपीठाची उभारणी केली. २४ ते ६५ वयोगटातील कोणीही महिला तनिष्का व्यासपीठाची सदस्या होऊ शकते. वीस सदस्यांचे गट करून त्यांना प्रशिक्षण देऊन स्थानिक पातळीवरील प्रकल्पांना चालना देणारे हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. आजमितीला राज्यात तनिष्का व्यासपीठाच्या एक लाख सदस्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com