महापालिकेच्या हद्दीत गावांचा समावेश करताना ‘टीपी स्किम’चा विचार करावा

PMRDA
PMRDA

पुणे - विकास आराखडा आणि नगर रचना योजनेच्या माध्यमातून पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) या गावांमध्ये अनेक योजना व प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. त्यामुळे गावे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करताना त्याचा विचार करावा, असे ‘पीएमआरडीए’ने राज्य सरकारला कळविले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य सरकारने यापूर्वीच पुणे महापालिकेच्या हद्दीत ११ गावे समाविष्ट केली आहेत, तर उर्वरित २३ गावे समाविष्ट करण्याबाबत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. ही गावे समाविष्ट करावीत की नाही, यासंदर्भात राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने यापूर्वीच पीएमआरडीए आणि महापालिकेकडून अभिप्राय मागविला होता. दरम्यान, काल पत्र पाठवून त्यावर महसूल खात्याकडूनदेखील अभिप्राय मागविला आहे.

पीएमआरडीएच्या हद्दीत सुमारे ८०० हून अधिक गावांचा समावेश आहे. या सर्व गावांचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात या गावांमध्ये अनेक प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. तसेच रिंगरोड प्रकल्पदेखील ‘पीएमआरडीए’ने हाती घेतला आहे. तो या गावांमधून जातो. त्यामुळे समाविष्ट करण्यात येणाऱ्या गावांमध्ये नगर रचना योजना (टीपी स्किम ) प्रस्तावित करण्यात आली आहे. 

dited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com