खंडणी उकळणाऱ्यांचा व्यापाऱ्यांना त्रास

सकाळ कार्यालय, बुधवार पेठ - ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या बैठकीत पूना ग्लास डिलर्स असोसिएशनचे पदाधिकारी.
सकाळ कार्यालय, बुधवार पेठ - ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या बैठकीत पूना ग्लास डिलर्स असोसिएशनचे पदाधिकारी.

पुणे - आपण माथाडी कामगार असल्याचे सांगून व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळणाऱ्यांचा त्रास होत असल्याची तक्रार पूना ग्लास डिलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच, दुकानांच्या आसपासच्या अतिक्रमणांमुळे काचसामान नेण्या-आणण्यात होणाऱ्या अडचणींकडेही त्यांनी लक्ष वेधले.

सकाळ कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीस पूना ग्लास डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम इदनानी, बाळासाहेब पवार, पुखराज संघवी, सुनील ओसवाल, बीरेन मेहता, रमेश जैन, ललित गेमावत, बनवारीलाल शर्मा, नुमानी काचवाला हे पदाधिकारी आणि पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळिया आदी उपस्थित होते. 

पुण्यातील काचांच्या व्यापाराची सुरवात छायाचित्रांच्या फ्रेमपासून झाली. त्यानंतर घरबांधणीतील खिडक्‍यांसारख्या ठिकाणी काचेचा वापर सुरू झाला. त्यातील फ्रेमचा प्रवास लाकडी-लोखंडी-ॲल्युमिनियम असा होत होत यूपीव्हीसीपर्यंत आला. ध्वनिप्रतिबंधक अत्याधुनिक काचा बसविण्यास पसंती देण्यात येऊ लागली आहे. संपूर्ण इमारतीला काचेचे बाह्यावरण करण्याचे प्रमाणही वाढले आहे. इंटिरियर डेकोरेशनसाठी १५० प्रकारच्या काचा वापरण्यात येतात. 

टफन काचेचा वापर फर्निचरमध्ये करण्यात येत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. या काचा प्लायवूडपेक्षाही स्वस्त व टिकाऊ ठरतात. राजस्थान, गुजरात, तमिळनाडू, उत्तराखंडमध्ये काचानिर्मितीचे प्रकल्प आहेत. पुणे, खंडाळा-पारगाव, यवत, कोंढवा येथे टफन ग्लासचे प्रकल्प आहेत.

पूना ग्लास डिलर्स असोसिएशनची १९४० मध्ये स्थापना 
पुण्यात काचांचे ३५० व्यापारी, संघटनेचे सदस्य ९०
पुण्यातील काचेच्या व्यापाऱ्यांची वार्षिक उलाढाल अडीच हजार कोटी          रुपयांवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com