व्यापाऱ्यावरील हल्ल्याचा रिटेल व्यापारी संघातर्फे जाहीर निषेध 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

गणेशोत्सवाच्या काळात वर्गणीसाठी व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना पुण्याजवळ वाकड येथे घडली आहे. पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे या हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.

पुणे : गणेशोत्सवाच्या काळात वर्गणीसाठी व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना पुण्याजवळ वाकड येथे घडली आहे. पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे या हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. वाकड येथे व्यापारी मेळावा आयोजित करून हल्ल्याचा निषेध करण्यात आला. आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांसह संपुर्ण कुटुंबावर वर्गणीसाठी 4 सप्टेंबरच्या मध्यरात्री जीवघेणा हल्ला केला. या जीवघेण्या हल्यात व्यापारी मात्र बचावला. या घटनेचा निषेध करण्यासाठी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने व्यापाऱ्यांची बैठक आज वाकड येथे आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, चंदालाल बाहेल, सोमाराम राठोड, सुधीर अग्रवाल, संतोष चौधरी, उमेश चौधरी, सुुुुनील गेहलोत, हिम्मत भाटी, प्रकाश भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते. 

वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने म्हणाले की, ''ऐच्छीक वर्गणीऐवजी जर मंडळाचे कार्यकर्ते त्रास देत असतील तर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करा. न घाबरता त्यांनी पोलिस स्टेशनला कळवावं त्यांना पोलिस विभागाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल.

''व्यापाऱ्यांनी त्रास देत असलेल्या मंडळाना वर्गणी देऊ नये,'' असे आवाहन सचिन निवंगुणे यांनी केले. ते म्हणाले की, ''व्यापारी हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत व्यापारी असा अन्याय सहन करणार नाही. पोलिसांकडून व्यापाऱ्यांना संरक्षण मिळावे आणि योग्य तपास करून आरोपींवर कडक कारवाई करावी.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traders' Union Protests Prohibition of Attack on Traders