पारंपरिक कपड्यांना पसंती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

दिवाळीनिमित्ताने कपडे खरेदीसाठी बाजारपेठा ग्राहकांनी फुलल्या आहेत. खरेदीदारांमध्ये तरुण- तरुणींचे प्रमाण जास्त आहे. पांरपरिकतेची जोड देणारे फॅशनेबल कपडे ग्राहकांना आकर्षित करत आहेत.

दिवाळीनिमित्ताने कपडे खरेदीसाठी बाजारपेठा ग्राहकांनी फुलल्या आहेत. खरेदीदारांमध्ये तरुण- तरुणींचे प्रमाण जास्त आहे. पांरपरिकतेची जोड देणारे फॅशनेबल कपडे ग्राहकांना आकर्षित करत आहेत. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्त्यावरील कपड्यांची बाजारपेठ नागरिकांनी गजबजून गेली आहे.

कुर्ता, जॅंकेट, शेरवानी, जीन्सचे विविध प्रकार तरुणांना आकर्षित करत आहेत. तर प्लाझो, प्लाझो स्कर्ट, कुर्ती, स्कर्ट कुर्ती, क्रॉप टॉप, लेहेंगा, पेन्सिल पॅंट यांना दिलेला वेस्टर्न टच तरुणींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. बाजारात आलेल्या विविध प्रकारच्या साड्याही महिलांचे लक्ष वेधून घेत आहेत. यामध्ये खणाची साडी, घागरा साड्यांना मागणी वाढलेली आहे. 

विविध प्रकारच्या चप्पल, शाही बूट बाजारात उपलब्ध झाले आहेत. सोबतच लहान मुलांसाठी धोतर कुर्ता, जॅकेट, नव्या पद्धतीचे टी-शर्ट आले आहेत. डिझाइन केलेल्या ड्रेसला दिलेला वेस्टर्न लूक आणि पांरपरिक लहेजा आम्हाला आकर्षित करतो. दिवाळी उत्सवाच्या निमित्ताने आम्हाला काहीतरी नवीन वापरायला मिळते, असे मत तरुणी मेघना इनामदार हिने व्यक्त केले. 

दिवाळीला शक्‍यतो तरुणी-महिला या नवीन येणाऱ्या ट्रेंडला पसंती देतात. आम्हाला पांरपरिक कपड्यांबरोबरच वेस्टर्न डिझाइनचे कपडेही ठेवावे लागतात. सध्या बाजारपेठेत नवीन ट्रेंडला पसंती आहे, असे विक्रेते कृष्णा बने यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: traditional clothing