बेशिस्त वाहनचालकांमुळे पुणे-नाशिक महामार्गावर मोशीत वाहनांच्या रांगाच रांगा

trafffic jam on the Pune Nashik highway Due to unruly drivers
trafffic jam on the Pune Nashik highway Due to unruly drivers

पुणे : दोन महिन्यांपूर्वी लॉकडाऊन उघडला आणि पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु झाली. या वाहतुकीदरम्यान पुणे-नाशिक महामार्ग व देहू आळंदी या मार्गावरील भारत माता चौकामध्ये बेशिस्त वाहनचालकांमुळे सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह वाहन चालकांना या वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. कोरोना संसर्गजन्य आजारामुळे गेल्या मार्च महिन्यापासून मागील दोन महिन्यांपर्यंत लाॅकडाऊन असल्यामुळे जीवनावश्यक वाहतूक सेवा सोडल्यास येथील पुणे नाशिक महामार्गावर अत्यंत कमी प्रमाणात वाहनांची वाहतूक सुरु होती. मात्र दोन महिन्यांनी वाहनांसाठी असलेला लाॅकडाऊन पूर्णपणे उघडण्यात आला आणि पुन्हा एकदा या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु झाली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भोसरी, चाकण, तळेगाव आदी ठिकाणी असलेली औद्योगिक वसाहत, त्याचप्रमाणे मोशी येथील श्री नागेश्वर महाराज उपबाजार समिती तसेच कार्यालयीन कामकाजासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांकडे येजा करण्याबरोबरच पुणे ते नाशिक प्रवास करणाऱ्या एसटी बसेस व खाजगी वाहनांची या महामार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. सकाळी सात ते अकरा व सायंकाळी सहा ते दहा या वेळेत मात्र या महामार्गावर प्रचंड मोठा प्रमाणावर वाहतूक होत असते. मोशी येथे असलेल्या टोलनाक्यावर खेड, चाकण या भागाकडून येणाऱ्या वाहनांच्या चिंबळी फाटा ते टोल नाका येथील सुमारे दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या असतात. या टोलनाक्यावर टोल भरल्यानंतर इथून अर्ध्या किलोमीटरवर असलेल्या पुणे नाशिक महामार्ग व देहू आळंदी महामार्ग या दरम्यान असलेल्या भारत माता चौकात येथील वाहतूक नियंत्रक दिवे यांच्या साहाय्याने वाहतूक सुरु असते. मात्र टोलनाका ते भारत माता चौक या दरम्यानही मोठ्याप्रमाणावर वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसतात.

पुण्यात रुग्ण फिरला तीन तास अन् उपचार पिंपरीत 

वाहतूक नियंत्रक दिव्यांमुळे ही वाहतूक अत्यंत सुरळीतपणे सुरू असते मात्र या चौकांमध्ये काही बेशिस्त दुचाकीस्वार तसेच चारचाकी वाहन चालकवाहतुकीचे नियम धुडकावत या चौकात आपली वाहने मधे घालतात व सुरळीत सुरु असलेली वाहतूक विस्कळीत करुन टाकतात. याच एका कारणामुळे चिंबळी फाटा ते भारत माता चौक या दोन ते अडीच किलोमीटर पर्यंत असलेल्या महामार्गावरील महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांकडून होत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com