सातारा महामार्गावर वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

पुणे-सातारा महामार्गावर साताऱ्याकडे जाणाऱ्या लेनवर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटर रांगा लागल्या होत्या. 20 ते 25 किलोमीटर अंतरात तीन ते चार ठिकाणी वाहतूक कोंडी असल्याने प्रवासी त्रस्त झाले होते.

नसरापूर (पुणे) : पुणे-सातारा महामार्गावर साताऱ्याकडे जाणाऱ्या लेनवर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटर रांगा लागल्या होत्या. 20 ते 25 किलोमीटर अंतरात तीन ते चार ठिकाणी वाहतूक कोंडी असल्याने प्रवासी त्रस्त झाले होते.

सोमवारी मतदानाची सुट्टी व मतदान करण्यासाठी गावाकडे निघालेल्या प्रवाशांच्या वाहनांची रविवारी महामार्गावरील पुणे-सातारा लेनवर मोठी गर्दी होती. या मध्येच वेळू, वरवे, नसरापूर व सारोळा येथे अपूर्ण उड्डाणपुलाच्या कामामुळे तीन लेनमध्ये चालणारी वाहने सेवा रस्त्याच्या दोन लेनवर आल्याने व त्यामध्ये सेवा रस्त्यावर असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूक संथ होऊन कोंडी होत होती. वरवे, नसरापूर व सारोळा येथे या कोंडीमुळे लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. सारोळा येथे तर किकवी गावापर्यंत वाहनांची रांग लागली होती. कोंडीमुळे त्रस्त झालेले वाहनचालक मिळेल तेथून रस्ता पार करून उलट्या दिशेने वाहन नेत असल्याने सातारा-पुणे लेनवर देखील काही ठिकाणी कोंडी होत होती.

महामार्ग वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी ठिकठिकाणी थांबून कोंडी होऊ नये म्हणून प्रयत्न करत होते. मात्र, खड्डेच जास्त असल्याने त्यांना देखील काहीच करता येत नव्हते. उलट्या दिशेने येणारी वाहने थांबवून सातारा-पुणे लेनवर वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता पोलिस कर्मचारी घेत होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic Affected on Satara Raod