वाहतूक कोंडीमुळे आळंदीकर त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

आळंदी - लग्नातील वऱ्हाडी मंडळींच्या गाड्यांची गर्दी आणि मरकळ धानोरे औद्योगिक भागातून येणाऱ्या अवजड वाहनांची संख्या वाढल्याने आळंदीकरांना वाहतूक कोंडीचा प्रत्यय येत आहे. अस्ताव्यस्त लावलेली वाहने आणि हातगाड्यांच्या अतिक्रमणांमुळेही या कोंडीत भर पडत आहे. चार जानेवारीपर्यंत आळंदीत रोज लग्नकार्ये असल्याने आणखी आठवडाभर वाहतूक कोंडीचा प्रत्यय येणार आहे.

आळंदीत सध्या लग्नांचा हंगाम सुरू आहे. वऱ्हाडी मंडळींची गर्दी दिसू लागली आहे. मागील चार दिवसांपासून वाहतूक कोंडीने आळंदीकर हैराण झाले आहेत. शुक्रवारी दिवसभर वाहतूक कोंडी होती. रात्री नऊनंतरही वाहतूक सुरू होती. भराव रस्ता, घुंडरे गल्ली, वडगाव रस्ता, चाकण रस्ता, प्रदक्षिणा रस्त्यावर लग्नासाठी आलेली चारचाकी वाहने लागल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली. अनेक मंगलकार्यालयांना वाहनतळ असूनही गाड्या रस्त्यावर उभ्या केल्या होत्या. भराव रस्त्यावर पाच ते सहा मंगलकार्यालये आहेत. मात्र एकालाही वाहनतळाची व्यवस्था नाही. घासवाले, फ्रूटवाले, परभणीकर, उभे बुक्केवाले, गोदी कामगार, कासार अशा अनेक धर्मशाळांमधून लग्नांची कार्ये पार पडतात. मात्र, या धर्मशाळांकडे लग्नासाठी आलेली वाहने सर्रास रस्त्यावर उभी असतात. हीच अवस्था गोपाळपुरात डांगे पंच धर्मशाळेसमोर दिसून येते.

पद्मावती रस्ता आणि वडगाव रस्त्यावर मंगलकार्यालयांना स्वतःची वाहनतळाची व्यवस्था नाही. मात्र एकाच वेळी दिवसभरात दोनहून अधिक लग्ने एकाच कार्यालयात घेतात. यामुळेही रस्त्यावर गर्दी होते.

Web Title: Traffic Alandi Public