बेवारस वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

बिबवेवाडी - सातारा रस्त्यासह स्वामी विवेकानंद मार्ग, बिबवेवाडी-कोंढवा रस्ता, के. के. मार्केट रस्ता, अप्पर कोंढवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बेवारस वाहने पडून आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येत असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. 

या बेवारस वाहनांबाबत एका वाचकाने ‘सकाळ संवाद’मध्ये प्रश्‍न मांडला होता.

के. के. मार्केट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्याच्याकडेला पडून आहेत. अप्पर कोंढवा रस्त्यावर अप्पर खिंडीचा रस्ता व पुढे व्हीआयटी वसतिगृह चौकापर्यंत रस्त्याच्याकडेला अनेक पडिक वाहने आहेत. अप्पर कोंढवा रस्ता मुळातच रुंदीला कमी असून रस्ता रुंदीकरण रखडलेले आहे. गंगाधाम चौक ते शत्रूंजय मंदिर रस्त्यावर अनेक वाहन दुरुस्तीची गॅरेज असून, रस्त्याच्याकडेला नादुरुस्त वाहने अनेक महिन्यांपासून पडलेली आहेत. खिंडीतील रस्त्याच्याकडेलाच उताराच्या बाजूने वाहने लावलेली असल्यामुळे येथे अनेकवेळा अपघात होतात. स्वामी विवेकानंद मार्ग सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे रस्त्यावर असलेली वाहने तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत स्थलांतरित केलेली आहेत; परंतु अशा वाहनांवर कोणतीही कारवाई केलेली नाही.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतूक पोलिसांनी संबंधित वाहनांवर कारवाईचे अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे संबंधित वाहनांची जागेसह माहिती वाहतूक पोलिसांना वेळोवेळी कळविण्यात येत आहे.
- अविनाश सकपाळ, सहायक आयुक्त, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय 

वाहतूक पोलिस वाहतुकीचे नियमन करत असताना पडिक वाहनांवर महापालिका प्रशासनाने कारवाई केली पाहीजे.
- अतुलकुमार नवघिरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहकारनगर 

Web Title: Traffic barrier due to unavoidable vehicles crime