हिंजवडी आयटी परिसरात संततधार पाऊस सुरूच; वाहतूकीचा खोळंबा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

हिंजवडी : सलग दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे हिंजवडी परिसरातील रस्ते जलमय झाले आहेत. काही ठिकाणी मुख्य रस्त्यालगत भराव टाकल्याने सर्व पाणी रस्त्यातून वाहत असल्याने आयटी परिसरात वाहतूकीचा खोळंबा होत आहे

हिंजवडी : सलग दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे हिंजवडी परिसरातील रस्ते जलमय झाले आहेत. काही ठिकाणी मुख्य रस्त्यालगत भराव टाकल्याने सर्व पाणी रस्त्यातून वाहत असल्याने आयटी परिसरात वाहतूकीचा खोळंबा होत आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

मुळा नदीला पूर आल्याने वाकड ,मानकर चौक परिसरात नदीकाठी असलेल्या,नर्सरी, झोपड्या, हॉटेल्स मध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. मान मारुजी नेरे जांबे कासारसाई परिसरात तील ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत तर नेरे परिसरात काही डेव्हलपर्स लोकांनी प्लॉट डबर मुरमाने भरल्याने लगतच्या भात शेतीचे नुकसान झाले आहे.

पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बदलल्याने अनेक ठिकाणी शेतीचे बांध फुटण्याची परस्थिती झाली आहे . शनिवारी पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढला असला तरी काही आयटी कंपन्यांनाना सुट्टी असल्याने वाहतुकीवर फारसा परिणाम जाणवला नाही .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic congestion due to heavy rainfall continues in Hinjewadi IT area