पुण्यातील वाहतूक कोंडी 'आरएसएस' सोडविणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

: शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेतला आहे. 15 ते 25 ऑगस्ट दरम्यान शहरातील सर्व भागात सुमारे 10 हजार स्वयंसेवक वाहतूकीच्या समस्येचा अभ्यास करणार आहेत. 

पुणे : शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेतला आहे. 15 ते 25 ऑगस्ट दरम्यान शहरातील सर्व भागात सुमारे 10 हजार स्वयंसेवक वाहतूकीच्या समस्येचा अभ्यास करणार आहेत. 

नेमकी समस्या काय आहे, हे समजून घेऊन त्या साठी उपाययोजना सुचविणार आहेत. या उपक्रमात संघ तसेच परिवारातील संस्था, आणि काही स्वयंसेवी संस्था, अशा 92 संस्था आणि वाहतूक क्षेत्रातील जाणकार सहभागी होणार आहेत. शहरासाठी वाहतूक सुधारणेचा अंतिम आराखडा महापालिका आणि वाहतूक पोलिसांना सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती संघाचे महानगर कार्यवाह महेश कर्पे, संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

संघातर्फे गेल्या तीन महिन्यांपासून या उपक्रमाची तयारी सुरू आहे. संघाच्या शाखांवरील स्वयंसेवक ही यात सहभागी होणार आहेत, असेही कर्पे यांनी स्पष्ट केले. पुणे- नगर रस्त्यावर वाघोलीमध्ये ग्रामपंचायत, लोकसहभागातून तेथील प्रश्न सोडविता आला. त्यातून प्रेरणा घेऊन शहराचा वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: traffic congestion in Pune will be solved by RSS