एसटी पंक्चर झाल्याने सासवड रस्त्यावर वाहतूक कोंडी

संदीप जगदाळे
गुरुवार, 10 मे 2018

हडपसर - सासवड रस्त्यावर एसटी पंक्चर झाल्याने तिन तास वाहतूक कोंडी झाली. मंतरवाडी फाटा ते भेकराईनगर या दोन किलोमिटर अंतरावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. याप्रकरणी वाहतूकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एसटीच्या चालकावर गुन्हा दाखल करून हडपसर वाहतूक विभागाने दंडात्मक कारवाई केली.

फुरसुंगी पुलावर पुणे स्टेशनहून जेजूरीला जाणारी एसटी पंक्चर झाली. पंक्चर काढण्यासाठी जॅक नसल्याने त्याच ठिकाणी एसटी थांबून होती. त्यामुळे अगोदरच अरूंद असलेल्या पूलावर वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांनी एसटीचालकाला गाडी पुढे नेण्यास सांगितले. मात्र चालकाने त्याला नकार दिला. एक तासानंतर हडपसर वाहतूक शाखेचे पोलिस निरिक्षक घटनास्थळी पोहचले. त्यांनी पंक्चर असलेल्या अवस्थेतच गाडी पुढे नेण्यास सांगितली. त्यामुळे हळुहळु वाहतूक कोंडी कमी झाली. मात्र मंतरवाडी चौक ते भेकराईनगर या दरम्यान वाहानांच्या रांगा लागल्या. त्यातच अनेक बेशिस्त वाहन चालकांनी वाहने पुढे नेण्याच्या प्रयत्नात वाहनांच्या तीन रांगा केल्या. त्यामुळे दहा पोलिसांच्या मदतीने तिन तासांनंतर वाहतूक सुरळीत झाली.

याबाबत हडपसर वाहतूक शाखेचे पोलिस नरिक्षक जे. डी. कळसकर यांनी एसटी चालक बाळू रामचंद्र बडदे यांच्यावर सार्वजनिक वाहतूकीला अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई केली.

Web Title: The traffic congestion on the Saaswad road due to ST Puncture